कलाकार म्हटलं की त्यांची नेटकऱ्यांच्या ट्रोलिंग मधून सुटका नाहीचं. बरीच कलाकार मंडळी ही त्यांच्या सोशल मीडियावरील वावरामुळे वा अभिनयामुळे ट्रोल होताना दिसतात. काहीजण या ट्रोलिंगवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसतात. तर काही या ट्रोलिंगकडे लक्ष देताना दिसतात. अशातच या ट्रोलिंगच्या कचाट्यात हमखास अडकणारी व ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणारी अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. सोशल मीडियावर अभिनेत्रीला बरेचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. (Mitali Mayekar Answers To Trollers)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ती अनेक फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मितालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं. त्यातही अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरून नेहमीच टार्गेट केलं जातं. सगळीकडे मितालीच्या या फोटोची विशेष चर्चा रंगली आहे. फक्त कपड्यांमुळेच नाही तर, तिच्या विचारांमध्ये बोल्ड असणारी मिताली नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.
मितालीने नुकतीच तिचा पती सिद्धार्थ चांदेकरसह महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने घातलेले एका स्पेशल ड्रेसवरील काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस घातलेला पाहायला मिळाला. या फोटोवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मितालीच्या या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये अपशब्द वापरत कमेंट केली आहे. यावर मितालीने कमेंट करत, “कोणीतरी त्यांची सकाळची औषधे घेतली नाहीत मला आशा आहे की तुम्ही लवकर बरे व्हाल” असं म्हणत नेटकऱ्याला चांगलाच डोस पाजलेला दिसत आहे.
‘स्माईल प्लिज’, ‘हॅशटॅग प्रेम’, ‘यारी दोस्ती’ या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे. तर ‘असंभव’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘फ्रेशर्स’ या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. मितालीनं काही दिवसांपूर्वी तिच्या फॉरेन ट्रीप्सचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. मितालीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स व कमेंट्सचा नेहमीच वर्षाव करताना दिसतात.