Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्ये प्रत्येक पर्वात होणाऱ्या वाद, विवाद, भांडण, तंटा, हेवेदावे, रूसवे-फुगव्यांमुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस १७’च्या यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडणं आता घरातील सदस्य व प्रेक्षकांनादेखील नवीन राहिले नाहीत. काहीना काही कारणांनी त्यांच्यात नेहमीच वाद होत असतात. अशातच नुकत्याच झालेल्या भागात अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खुपच व्हायरल होत आहे. (Ankita Lokhande Throw Chappal On Vicky Jain Video Viral)
नुकत्याच झालेल्या भागात अनेक स्पर्धकांचं जेवणावरुन भांडण झालेलं पाहायला मिळालं. अभिषेक कुमार आणि खानजादीमध्ये हे भांडण झालं होतं. पुढे या भांडणात विकी व ईशा मालवीय सहभागी झाले. या भांडणाआधी विकी अंकिताबरोबर मजा-मस्ती करत होता. त्यावेळी मज्जा-मस्ती करताना अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली आहे. या व्हिडीओत अंकिताने अनेकदा विकीला चप्पलने मारलं आहे. मात्र हे सगळं त्यांच्यात गंमतीत चाललं होतं. दरम्यान त्यांच्यात रोज होणाऱ्या भांडणामुळे घरातील स्पर्धक व प्रेक्षक हैराण झाले होते.
अशातच त्यांच्यात झालेल्या या मजेशीर भांडणाने शोमध्ये वेगळीच मज्जा आली. दरम्यान त्यांच्या भांडणाची सनी आर्यने चांगलीच मज्जा घेतली. या भांडणात सनी मोठमोठ्याने “एका पत्नीने पतीला नॅशनल टीव्हीवर चपलेने मारलं” असं ओरडताना दिसत आहे. त्यांच्या या भांडणाचा घरातील इतर स्पर्धकांनीदेखील चांगलाच आनंद घेतला आहे. त्याचबरोबर इतके दिवस त्यांच्या भांडणाला वैतागलेल्या प्रेक्षकांचीही या व्हिडीओने मनं जिंकली आहेत.
आणखी वाचा – आदेश बांदेकरांची सून कशी असणार?, लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाला, “कशीही चालेल पण आईला…”
दरम्यान अंकिता नुकत्याच तिच्या गरोदरपणाच्या आणि सुशांत सिंह राजपूतबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यात आता अंकिता-विकी या पती-पत्नीच्या मजेशीर भांडणाच्या व्हिडीओने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.