शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवऱ्याने मान पकडताच अंकिता लोखंडेने विकी जैनला फेकून मारली चप्पल, व्हिडीओ तुफान व्हायरल, घरातील सदस्य म्हणाले…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 22, 2023 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss 17 actress ankita lokhande throw chappal on husband vicky jain video viral on social media

Video : नवऱ्याने मान पकडताच अंकिता लोखंडेने विकी जैनला फेकून मारला चप्पल, व्हिडीओ तुफान व्हायरल, घरातील सदस्य म्हणाले…

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्ये प्रत्येक पर्वात होणाऱ्या वाद, विवाद, भांडण, तंटा, हेवेदावे, रूसवे-फुगव्यांमुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस १७’च्या यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडणं आता घरातील सदस्य व प्रेक्षकांनादेखील नवीन राहिले नाहीत. काहीना काही कारणांनी त्यांच्यात नेहमीच वाद होत असतात. अशातच नुकत्याच झालेल्या भागात अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खुपच व्हायरल होत आहे. (Ankita Lokhande Throw Chappal On Vicky Jain Video Viral)

नुकत्याच झालेल्या भागात अनेक स्पर्धकांचं जेवणावरुन भांडण झालेलं पाहायला मिळालं. अभिषेक कुमार आणि खानजादीमध्ये हे भांडण झालं होतं. पुढे या भांडणात विकी व ईशा मालवीय सहभागी झाले. या भांडणाआधी विकी अंकिताबरोबर मजा-मस्ती करत होता. त्यावेळी मज्जा-मस्ती करताना अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली आहे. या व्हिडीओत अंकिताने अनेकदा विकीला चप्पलने मारलं आहे. मात्र हे सगळं त्यांच्यात गंमतीत चाललं होतं. दरम्यान त्यांच्यात रोज होणाऱ्या भांडणामुळे घरातील स्पर्धक व प्रेक्षक हैराण झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Shubham Srivastav (@shubhamsrivastav18)

आणखी वाचा – दारुची नशा, दोन वेळा हृदयविकाराचा झटका अन्…; सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची झाली होती वाईट अवस्था, म्हणाला, “मी पूर्णपणे…”

अशातच त्यांच्यात झालेल्या या मजेशीर भांडणाने शोमध्ये वेगळीच मज्जा आली. दरम्यान त्यांच्या भांडणाची सनी आर्यने चांगलीच मज्जा घेतली. या भांडणात सनी मोठमोठ्याने “एका पत्नीने पतीला नॅशनल टीव्हीवर चपलेने मारलं” असं ओरडताना दिसत आहे. त्यांच्या या भांडणाचा घरातील इतर स्पर्धकांनीदेखील चांगलाच आनंद घेतला आहे. त्याचबरोबर इतके दिवस त्यांच्या भांडणाला वैतागलेल्या प्रेक्षकांचीही या व्हिडीओने मनं जिंकली आहेत.

आणखी वाचा – आदेश बांदेकरांची सून कशी असणार?, लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाला, “कशीही चालेल पण आईला…”

दरम्यान अंकिता नुकत्याच तिच्या गरोदरपणाच्या आणि सुशांत सिंह राजपूतबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यात आता अंकिता-विकी या पती-पत्नीच्या मजेशीर भांडणाच्या व्हिडीओने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Tags: ankita lokhandebigg boss 17entertainmententertainment newsvicky jain
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
Next Post
Baipan Bhari Deva Actress Foreign Trip

Video : 'बाईपण भारी देवा'च्या अभिनेत्रींचा थायलँडमध्ये कल्ला, बांदेकरांची बायको क्रूजमधील व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "अशा ठिकाणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.