शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदेश बांदेकरांची सून कशी असणार?, लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाला, “कशीही चालेल पण आईला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 22, 2023 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Soham Bandekar On Ask Me Anything

आदेश बांदेकरांची सून कशी असणार?, लेकाला प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाला, "कशीही चालेल पण आईला…"

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आदेश बांदेकर यांचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंबही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. बांदेकरांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनीही अनेक चित्रपट मालिकांमधून काम करत सिनेसृष्टीत स्वतःची अशी ओळख निर्माण केली. याशिवाय बांदेकरांचा लेक सोहम बांदेकरही अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. आई वडिलांपाठोपाठ सोहम बांदेकरचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Soham Bandekar On Ask Me Anything)

सोहमने त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवास हा मालिकेपासून सुरु केला. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सोहम झळकला होता. या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत तो दिसला होता. त्याचप्रमाणे सोहमने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा – Video : …अन् पुरस्कार सोहळ्यादरम्यान सलमान खानने ‘त्या’ महिलेला घट्ट मिठी मारत केलं किस, व्हिडीओ पाहून होतंय कौतुक कारण…

सोहम हा सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोहमचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. बरेचदा सोहम त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावरून एका चाहत्याला सोहमने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे सोहम सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी ‘Ask me anything काहीच लपवणार नाही मी पक्का’ या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी सोहमने त्याच्या चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तर दिली.

आणखी वाचा – अतरंगी फॅमिलीची जगावेगळी स्टोरी, विनोदवीरांची धमाल अन्…; ‘एकदा येऊन तर बघा’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

या सेगमेंटदरम्यान चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नावर सोहमने दिलेलं उत्तर साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या सेगमेंटमध्ये एका चाहत्याने सोहमला प्रश्न विचारला की, “कशी मुलगी हवी तुला बायको म्हणून?” यावर सोहमने दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेत आहे. सोहमने चाहत्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं की, “कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस” असं गमतीत उत्तर दिलं आहे. सोहम याआधीही एका फॉरेनर मुलीबरोबरच्या व्हायरल फोटोवरून चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने यावर स्पष्टीकरण देत हा एक चित्रपटातील सीन असल्याचं सांगितलं.

Tags: Aadesh Bandekarentertainmentmarathi actorsoham bandekarSoham Bandekar On Ask Me Anythingsuchitra bandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Anurag kashyap shocking revelation

दारुची नशा, दोन वेळा हृदयविकाराचा झटका अन्…; सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची झाली होती वाईट अवस्था, म्हणाला, “मी पूर्णपणे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.