रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीनची प्रकृती बिघडली, रुग्णालयामध्ये सुरु आहेत उपचार, शेअर केला फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 10, 2023 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jasmin Bhasin hospitalised

सुप्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीनची प्रकृती बिघडली, रुग्णालयामध्ये सुरु आहेत उपचार, शेअर केला फोटो

अभिनेत्री शहनाज गिल रुग्णालयामध्ये भरती असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तिने स्वतःही रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबाबत सांगितले. शहनाजच्या उत्तम आरोग्यासाठी चाहतेमंडळी प्रार्थना करत आहेत. आता शहनाज नंतर आणखी एक अभिनेत्री रुग्णालयामध्ये भरती झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. अभिनेत्री जस्मिन भसीन रुग्णालयामध्ये भरती झाली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे फोटो पोस्ट करत तिने याबाबत सांगितलं. तिने रुग्णालयामध्ये भरती होण्यामागचं कारणंही सांगितलं.

जस्मिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रुग्णालयामध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिच्यावर उपचार सुरु असल्याचं यामधून दिसत आहे. फोटो शेअर करत तिने पोटामध्ये इन्फेक्शन झालं असल्याचं सांगितलं. पण आता नेमकी तिची प्रकृती कशी आहे? हे जस्मिनने सांगितलं नाही. तिच्या पोस्टनंतर चाहतेही चिंतेत पडले आहेत. पोटामध्ये इन्फेक्शन कशामुळे झालं? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर दत्तू मोरेचा दांडिया डान्स, तर ओंकार राऊतचा गरबा पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

जस्मिन काही दिवस कर्जतमध्ये राहत होती. बॉयफ्रेंड अली गोनी व मित्र-मंडळींबरोबर तिने तिथे एकत्रित वेळ घालवला. अली व जस्मिनने यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते. तिथे नेमकं काय घडलं? कधी जस्मिनला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं याबाबत दोघांनीही बोलणं टाळलं आहे.

आणखी वाचा – गाय आडवी आली, पावसामुळे पूल वाहून गेला अन्…; तेव्हा आदेश बांदेकरांनी अनुभवला दैवी चमत्कार, म्हणाले, “घोंगडी घातलेला व्यक्ती…”

View this post on Instagram

A post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)

जस्मिन व अली मागील काही वर्षांपासून एकमेकाला डेट करत आहेत. ‘बिग बॉस १४’मध्ये प्रवेश केल्यानंतर या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचीही अधिकाधिक पसंती मिळताना दिसते. तसेच अली व जस्मिन अगदी खुलेपणाने एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आताही जस्मिन रुग्णाल्यामध्ये असताना अली तिची उत्तमरित्या काळजी घेत आहे.

Tags: entertainmententertainment newsentertainment update
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Genelia Deshmukh wishes her Mother-in-law on their Birthday

"स्वतःच्या मुलीसारखं मला…", जिनिलीया देशमुखची सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली, "माझी मराठी भाषा सुधारण्यासाठी तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.