अभिनेत्री जिनिलिया देशमुखने मराठी व बॉलिवूडसह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात तिने साकारलेल्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच. शिवाय, आपल्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना आपलंसं केलं आहे. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर जिनिलियाने लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याच्याशी लग्न केले आणि ती अवघ्या महाराष्ट्राची वाहिनी झाली. (Genelia Deshmukh wishes her Mother-in-law on their Birthday)
अभिनयाबरोबर जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटोज तिच्या चाहत्यांसह शेअर करते. आता जिनिलियाने तिच्या सासूबाईंसाठी खास पोस्ट केली आहे. अभिनेता रितेश देशमुख यांच्या आईचा आज वाढदिवस. त्यानिमित्त तिने एक खास पोस्ट शेअर करत सासूबाईंचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
हे देखील वाचा – “खोट्या बातम्या…”, पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे ट्रोल झाल्यानंतर भडकला अक्षय कुमार, म्हणाला, “माझा या ब्रँडशी…”
जिनिलियाने तिच्या सासूबाईंचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये त्या त्यांच्या दोन्ही नातवंडांसह दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, “प्रिय आई, एक आधुनिक विचारांची स्त्री कशी असते, हे मला सांगितल्याबद्दल धन्यवाद. स्वतःच्या मुलीप्रमाणे माझ्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. दररोज माझी मराठी सुधारण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद. आणि माझी आई असल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.”, असं म्हणत तिने तिच्या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर नेटकरी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पुण्यामध्ये सुरु केलं स्वतःचं हॉटेल, शेअर केले Inside Photos, व्यवसायासाठी अशी घेत आहे मेहनत
जिनिलिया आणि रितेश यांना महाराष्ट्राचे लाडके दादा-वाहिनी म्हणून ओळखले जातात. लग्नानंतर ती तिच्या कुटुंबियांशी व इथल्या संस्कृतीशी एकरूप झाली. त्यातही ती व तिच्या सासूबाईंचे खूप छान बॉण्डिंग दिसून आले. कामाबरोबरच तिने तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. सिनेसृष्टीतून अनेक वर्ष ब्रेक घेतल्यानंतर जिनिलियाने ‘वेड’ या मराठी चित्रपटातून पुनरागमन केले. सध्या ती अनेक प्रोजेक्टसमध्ये काम करताना दिसत आहे. याशिवाय, ती चित्रपट निर्मितीकडे लक्ष देताना दिसते.