मंगळवार, जून 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 26, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 Arijit Singh Net Worth

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

 Arijit Singh Net Worth : प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्या परिचयाची कोणालाच गरज नाही. ते आजच्या काळातील सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक आहेत. देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. अरिजित सिंगला पैसा, दर्जा आणि प्रसिद्धीची कमतरता नाही. असे असूनही त्याला साधेपणाचे जीवन जगणे आवडते. अरिजित सिंगच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया. जवळपास दशकभराच्या कारकिर्दीत, अरिजित सिंगने हिंदी, बंगाली, मराठी आणि तेलगूसह अनेक भाषांमध्ये 300 हून अधिक गाणी गायली आहेत. अरिजीतने आपल्या गायनाच्या कारकिर्दीत प्रसिद्धीसोबतच नावलौकिकही मिळवला आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अरिजित सिंगची एकूण संपत्ती ४१४ कोटी रुपये आहे. तो भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांपैकी एक आहे. वृत्तानुसार, अरिजिती सिंग यांच्याकडे नवी मुंबईत सुमारे ८ कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय सिंगरचे मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या एका इमारतीत चार अपार्टमेंट आहेत, प्रत्येक फ्लॅटची किंमत सुमारे ९ कोटी रुपये आहे. अरिजिती सिंगच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी वाहनांचा समावेश आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर वोग, हमर एच3 आणि मर्सिडीज बेंझ सारख्या गाड्या आहेत. याशिवाय, तो पश्चिम बंगालमधील जियागंज येथे असलेल्या परवडणाऱ्या रेस्टॉरंटचाही मालक आहे.

आणखी वाचा – भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

View this post on Instagram

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

अरिजित सिंग पार्श्वगायन, लाइव्ह कॉन्सर्ट, ब्रँड एंडोर्समेंट आणि म्युझिक रॉयल्टीमधून कमाई करतात. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अरिजितची वार्षिक कमाई सुमारे ७० कोटी रुपये आहे. त्याची कमाई त्याचे विकले गेलेले लाइव्ह शो आणि जगभरातील त्याचे प्रचंड चाहते आहे. अरिजित सिंग एका चित्रपटात गाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये घेतात. प्रकल्प मोठा असेल तर ही रक्कम आणखी वाढू शकते. त्याच्या लाइव्ह शोबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.

आणखी वाचा – “त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

संगीतकार मॉन्टी शर्माने गेल्या वर्षी ‘ललनटॉप’ला सांगितले होते की, अरिजित एका परफॉर्मन्ससाठी २ कोटी रुपये घेतो. याशिवाय दोन तासांच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी तो सुमारे १४ कोटी रुपये घेतो. गायक असण्यासोबतच अरिजीत संगीतकार, संगीत निर्माता आणि वादक देखील आहे. त्याने २००५ मध्ये ‘फेम गुरुकुल’ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेऊन त्याच्या करिअरला सुरुवात केली. अरिजित सिंगने २०११ मध्ये ‘मर्डर 2’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याद्वारे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘तुम ही हो’, ‘केसरिया’ सारखी अनेक हिट गाणी दिली. त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गायकाला २०२५ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

Tags: arijit singhbollywood singersinger life
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
 air conditioner health risks

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.