होळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. रंगांचा सण म्हणून या सणाकडे पाहिले जाते. सर्वच ठिकाणी हा सण आनंदाने साजरा करतात. बॉलिवूडमधील सर्व कलाकार होळी साजरा करतानाचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री यामिनी सिंहचा होळी पार्टीचा एक किस्सा समोर आला आहे. हा किस्सा सांगताना तिच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत. (Bhojpuri actress yamini singh)
भोजपुरी चित्रपटात यामिनीने अनेक भूमिका केल्या आहेत. तिने होळीमध्ये घडलेला किस्सा नुकताच सांगितला आहे. यामिनीने एकदा एका होळी पार्टीमध्ये दूध समजून भांग प्यायली होती. तेव्हा तिच्याबरोबर जे घडलं ते ऐकून सर्वजण हैराण झाले होते. यामिनीचा हा किस्सा तिच्या कॉलेजच्या दिवसातील होता. त्याचा खुलासा स्वतः अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला आहे.
यामिनीने सांगितलं की, “कॉलेजच्या दिवसांमध्ये मी खूप छान प्रकारे होळी खेळले होते. एकदा तर मी दूध समजून नऊ ग्लास भांग प्यायले होते. जेव्हा मी ते प्यायले तेव्हा मला काहीच कळले नाही. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझं डोकं फिरू लागलं. माझा एक मित्र माझ्याजवळ होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आला आणि त्याने अचानक माझ्या कानाखाली मारली. त्याने मारताच मला अचानक सर्व समजू लागले आणि मला कळलं की मी जे दूध प्यायले त्यामध्ये भांग मिसळले होते”.
पुढे ती म्हणाली की, “मी भांगेच्या नशेत मित्रांना रस्ता वर का चालला आहे? असं विचारत होते त्यावर ते मला म्हणाले की रस्ता बरोबर आहे तुझे डोळे फिरत आहेत. त्यानंतर मी मित्रांबरोबर बाहेर गेले. तिथे मी आठ रोल खाल्ले आणि चार ते पाच ग्लास ज्यूस प्यायले. त्यानंतर मी घरी गेले आणि झोपले. ती माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली होळी होती”.
हा किस्सा सांगताना ती खूप हसत होती. यामिनीने चित्रपटसृष्टीमध्ये करिअर करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. तिच्या ऊंचीमुळे तिला चित्रपटामध्ये काम मिळणे कठीण होते पण आज ती भोजपुरी इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.