सध्या सर्वत्र होळीची धामधूम सुरु झालेली पाहायला मिळत आहे. होळीनिमित्त सर्वत्र खमंग पुरणपोळीचा सुंगंध पसरलेला पाहायला मिळत आहे. होळी स्पेशल पुरणपोळीचा नैवेद्य सर्वांच्याच घरी आवर्जून केला जातो. अशातच एका कलाकाराच्या घरीही पुरणपोळीचा बेत केलेला पाहायला मिळाला. या अभिनेत्रीने नव्हेतर तिच्या नवऱ्याने खास पुरणपोळीचा बेत केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित. होळीनिमित्त महाराष्ट्रातील घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. (Madhuri Dixit Husband)
अशातच होळी स्पेशल खास पुरणपोळी डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने हे देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे रेसिपी व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळत असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. अशातच यावेळी श्रीराम यांनी पुरणपोळीचा बेत केला. सर्वप्रथम त्यांनी पुरण वाटून घेतलं. त्यांनतर पुरणपोळी लाटून, ती तव्यावर शेकवून त्यावर तुपाची धार सोडलेली या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
“होळी हा महाराष्ट्रातील कौटुंबिक सण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घरोघरी प्रेमाने बनवली जाणारी सगळ्यांची आवडती पुरणपोळी कशी करतात हे आज तुम्ही माझ्याकडून शिका”, असं म्हणत माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शेवटी त्यांचे आई-वडील लेकाने बनवलेली पुरणपोळी खाताना दिसत आहेत.
“माधुरी पोरीनं नशीब काढलं नवऱ्याला पुरण पोळी येते न्हवं लय भारी”, “डॉक्टर साहेब एक नंबर”, “सर तुम्ही पुरणपोळी बनवली खूप छान वाटलं”, “जमली की डॉ. साहेब तुम्हाला. लकी आहेत माधुरी मॅम”, अशा कमेंट करत डॉ.नेनेंच कौतुक केलं आहे. डॉ. श्रीराम नेने यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तर माधुरी व डॉ. नेनेंची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये दिग्गज मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली.