शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लोक मला विचारत आहे की…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावरुन शरद पोंक्षेंचं भाष्य, म्हणाले, “पुढील चार दिवसांत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 23, 2024 | 6:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
sharad ponkshe on swatantrya veer sawarkar

“लोक मला विचारत आहे की...”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावरुन शरद पोंक्षेंचं भाष्य, म्हणाले, “पुढील चार दिवसांत...”

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता शरद पोंक्षे हे त्यांच्या बेधडक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. आता ते त्यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावकर’ या चित्रपटावर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. यामध्ये रणदीपने सावरकरांची भूमिका साकारली असून अभिनेत्री अंकिता लोखंडेने सावरकरांची पत्नी यमुनाबाई यांची भूमिका केली आहे. पण आता पोंक्षे यांच्या पोस्टवरुन ते नक्की काय म्हणणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. (sharad ponkshe on swatantrya veer sawarkar)

त्यांनी आता पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “प्रत्येकाने पाहायला हवा. मी सध्या दुसऱ्या सिनेमामध्ये व्यस्त असल्याने मला अजून हा चित्रपट बघणं जमलं नाही. पुढील दोन दिवसांत मी चित्रपट बघून एक छान व्हिडीओ प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे खूप लोक मला विचारत आहेत की तुम्ही अजून या चित्रपटाबद्दल अजून काहीच का बोलला नाहीत. त्यामुळे आधी चित्रपट पाहावा आणि मग त्यावर सविस्तर बोलावं असं मी ठरवलं आहे. पुढील चार दिवसांत माझा व्हिडीओ येईल”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री दूध समजून नऊ ग्लास भांग प्यायली आणि…; स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाली, “मित्राने माझ्या कानाखाली मारली तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

त्यांच्या या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ते नक्की काय बोलणार याबद्दल सर्वांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस झाला असून सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शनिवार व रविवारच्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा – Video : नवरा असावा तर असा! माधुरी दीक्षितच्या पतीने स्वतः बनवली पुरणपोळी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी सुमारे २० ते २५ कोटी रुपये खर्च आला आहे. या चित्रपटासाठी रणदीपने स्वतःचे घरदेखील विकल्याचे सांगितले होत. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीपने पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तसेच या चित्रपटासाठी रणदीपने खूप मेहनत घेतली असल्याचेही दिसून आले आहे. या भूमिकेसाठी रणदीपने तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे. त्याच्या या मेहनतीचे त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

Tags: instagram postmarathi actorsharad ponksheswatantrya veer sawarkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Titeeksha Tawde and Khushboo Tawde

Video : शाळेमधील दप्तर ते लग्नापूर्वीची बॅग भरण्याचा प्रवास, तितीक्षा तावडेने शेअर केला भावुक व्हिडीओ, बहिणींमधील प्रेम पाहून चाहतेही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.