शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवोदित कलाकारांना अनुराग कश्यप यांच्याबरोबर मीटिंग करायची असेल तर द्यावे लागणार पैसे, दिग्दर्शकाचं मोठं विधान, म्हणाले, “वेळ वाया…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 23, 2024 | 5:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Director Anurag Kashyap instagram post

नवोदित कलाकारांना अनुराग कश्यप यांच्याबरोबर मीटिंग करायची असेल तर द्यावे लागणार पैसे, दिग्दर्शकाचं मोठं विधान, म्हणाले, "वेळ वाया..."

आपल्या बेधडक विधानांमुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप अनेकदा चर्चेत असतो. त्याने अनेकदा त्याने राजकारणी, मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांवर त्याने अनेकदा टिका केली आहे. पण आता त्याने नवोदित कलाकारांवर निशाणा साधला आहे. नवोदित कलाकरांसाठी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर त्याची मुलगी आलिया कश्यपनेही मजेशीर प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Director Anurag Kashyap instagram post)

अनुराग हा नेहमीच वास्तववादी चित्रपट करण्यावर भर देत असतो. त्याचे चित्रपट हे नेहमी वेगळ्या धाटणीचे असलेले पहायला मिळतात. अशातच त्याने नवोदित कलाकारांसाठी केलेली पोस्ट आता चर्चेत आली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नवोदित कलाकारांना मदत करण्याच्या प्रयत्नामध्ये मी नेहमी माझा वेळ वाया घालवलेला आहे. त्यातील अनेक कलाकार चांगले निघाले नाहीत. त्यामुळे आता यापुढे अशा लोकांना भेटण्यासाठी मी माझा वेळ वाया घालवणार नाही जे स्वतःला अतिशहाणे समजतात. त्यामुळे मी आता त्यांच्यासाठी शुल्क आकरण्याचा विचार करणार आहे. जर कोणाला मला १० ते १५ मिनिटांसाठी भेटायचं असेल तर मी त्यासाठी एक लाख रुपये शुल्क घेणार आहे”.

आणखी वाचा – Video : नवरा असावा तर असा! माधुरी दीक्षितच्या पतीने स्वतः बनवली पुरणपोळी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

पुढे त्याने लिहिले आहे की, “अर्ध्या तासासाठी मी दोन लाख रुपये घेणार आहे आणि ज्यांना मला एक तासासाठी भेटायचे असेल तर त्यांना मला पाच लाख रुपये द्यावे. हे सर्व शुल्क आता आकरले जातील. मी आता मीटिंग करुन थकलोय. जर तुम्हाला हे परवडणार असेल तरच मला कॉल करा अन्यथा येऊ नका. तसेच सर्व पैसे आगाऊ स्वरूपात द्यावेत”.

आणखी वाचा – अनुष्का-विराटचं फ्लाइंग किस ते बॉलिवूड कलाकारांचा दंगा, IPLमध्ये बॉलिवूडकर जेव्हा भाव खाऊन गेले तेव्हा…; काही खास क्षण

ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तसेच मला मेसेज किंवा टेक्स्ट करु नका. आधी पैसे भरा मगच तुम्हाला मी वेळ देईन. मी समाजसेवा करणार नाही. जे शॉर्टकट शोधतात त्यांना मी कंटाळलो आहे”.

अनुरागच्या या पोस्टवर त्याच्या मुलीने प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, “मी माझ्या मेसेजमध्ये आणि मेलमध्ये तुमची ही पोस्ट शेअर करते जे मला नेहमी स्क्रिप्ट पाठवतात”.

त्याच्या या पोस्टवर इतर नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाले आहेत की, “मी आता तुमच्या दाराची बेल वाजवणारच होतो”, “होळीच्या आधी भांग पिऊ नये”, अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत.

Tags: anurag kashyapdirector Anurag kashyapinstagram postviral post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Bhojpuri actress yamini singh

सुप्रसिद्ध अभिनेत्री दूध समजून नऊ ग्लास भांग प्यायली आणि…; स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाली, "मित्राने माझ्या कानाखाली मारली तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.