Actress Reveals Her Daughter Face : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी हिने ‘मधुबाला’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात ओळख मिळवली. या मालिकेतील तिच्या दमदार अभिनयामुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली. मात्र गेल्या काही वर्षांपासून दृष्टी अभिनयापासून दूर आहे. वैयक्तिक आयुष्याला अधिक प्राधान्य देत ती कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, दृष्टी धामीच्या आयुष्यातील एक अतिशय खास क्षण आता चाहत्यांसोबत शेअर करण्यात आला आहे. लग्नानंतर तब्बल नऊ वर्षांनी दृष्टी आई झाली होती. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी तिने तिच्या पहिल्या लेकीला जन्म दिला. मुलीचं नाव तिने ‘लीला’ ठेवलं असून, आतापर्यंत दृष्टीने तिच्या लेकीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नव्हता.
नवीन वर्षाच्या निमित्ताने दृष्टीने चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर लेकीचे क्युट फोटो शेअर करत प्रथमच तिचा चेहरा जगासमोर आणला. या फोटोंना “Hello World! Meet: Ms. Leela Khemka” असं गोड कॅप्शन देण्यात आलं आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये लीला केकजवळ उभी असल्याचं दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये दृष्टी आणि तिचा पती नीरज खेमका लेकीला मांडीवर घेऊन बसले आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये आई-लेकीचा अत्यंत क्युट अंदाज पाहायला मिळतो.
दृष्टीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, चाहत्यांसह अनेक टीव्ही कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जेनिफर विंगेट, श्रिती झा, आश्का गोराडिया, शब्बीर अहलूवालिया, कृतिका कामरा, मुक्ती मोहन, अर्जित तनेजा यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या पोस्टवर प्रेम व्यक्त केलं आहे. दृष्टी धामी आणि नीरज खेमका यांनी सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर नऊ वर्षांनी हे जोडपं २०२४ मध्ये आई-बाबा झाले.
आणखी वाचा – मालिकाविश्व गाजवलेल्या अभिनेत्रीच्या नव्या मालिकेचा आठ महिन्यांतच निरोप, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…





