सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याचे बाबाही आहेत सिनेविश्वात; हेमंत ढोमेच्या चित्रपटातील त्यांच्या डान्सची चर्चा, लेकाकडून अभिमान व्यक्त

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 2, 2026 | 5:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag fame actor New Update

लेकाने व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला अभिमान

Tharal Tar Mag fame actor New Update : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मराठी भाषेचं महत्त्व, शिक्षणव्यवस्थेतील सामाजिक प्रश्न यांचा संवेदनशील पद्धतीने वेध घेणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे. या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या असून, त्यापैकी ज्येष्ठ अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांची भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहे. धनंजय सरदेशपांडे हे ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता चैतन्य सरदेशपांडे यांचे वडील आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चैतन्यने आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्याविषयीचा अभिमान व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – मालिकाविश्व गाजवलेल्या अभिनेत्रीच्या नव्या मालिकेचा आठ महिन्यांतच निरोप, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Chaitanya Sardeshpande (@sarchaitanya)

दरम्यान, या सिनेमातील ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यावर केवळ प्रेक्षकच नाही, तर अनेक शालेय विद्यार्थीं ही डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. चित्रपटातील या गाण्याचा सीन प्रेक्षकांना विशेष भावलेला असून, सर्व कलाकारांनी एकत्र येऊन केलेला डान्स प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या गाण्याच्या शेवटच्या भागात धनंजय सरदेशपांडे यांच्यासह हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांचा उत्स्फूर्त डान्स पाहायला मिळतो.

आणखी वाचा – टेलिव्हिजनचे कलाकार झळकणार मोठ्या पडद्यावर, मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी जोडी, हास्यजत्रेतील ही अभिनेत्री आणि…

चैतन्य सरदेशपांडेने या गाण्यातील वडिलांचा डान्स व्हिडीओ शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.त्याने पोस्ट शेअर करत लिहिलं की, “मी नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी सिनेमा पाहिला. या सिनेमाचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटात एक फार गोड गोष्ट आहे… ती गोष्ट म्हणजे… बाबांचा डान्स! मला त्यांचा खूप अभिमान वाटतोय. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचे मी मनापासून आभार मानतो…या चित्रपटाच्या निमित्ताने बाबांना वेगळं काहीतरी करता आलं. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. Love You Guys” अस लिहीत त्याने आनंद व्यक्त केला आहे.

Tags: marathi actormarathi serialtharal tar magTharal Tar Mag fame actor New Update
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Actor Siddharth Prabhu Hit & Run Case

साऊथ अभिनेत्याची मद्यधुंद अवस्थेत चारचाकीला धडक; अपघातादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.