Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu Serial Off Air: मालिका हा प्रेक्षकांचा अगदी आवडीचा विषय असतो. अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतात. तर काही जुन्या मालिका निरोप घेताना दिसत आहेत. अशातच स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असल्याचं नेहमीच दिसून येतं. नव्या वर्षात देखील या वाहिनीने प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची घोषणा केली. ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ व ‘तुझ्या सोबतीने’ या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर आता नव्या मालिका सुरु होत असताना आणखी एक जुनी आणि लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवरून ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची नवी सुरुवात; हक्काचं घर घेत दिली आनंदाची बातमी, म्हणाली…
‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका २८ एप्रिल २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील लोकप्रिय जोडी गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव हे जोडी या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमर आली होती. मात्र आता आठ महिन्यांनंतर ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेने तब्बल चार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिका अवघ्या आठ महिन्यांमध्येच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नुकताच मालिकेच्या सेटवर शेवटचा दिवस साजरा करण्यात आला. मालिकेतील कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu Serial Off Air)

दरम्यान ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत अभिनेत्रीने गिरीजा प्रभूने कावेरी ही भूमिका साकारली होती तसेच अभिनेता मंदार जाधव यशच्या भूमिकेत पाहायला मिळत होता. याशिवाय मालिकेत सुकन्या मोने, साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य असे बरेच कलाकार मालिकेत पाहायला मिळत होते. दरम्यान आता ही मालिका निरोप घेत असून प्रेक्षक देखील नाराज झाले आहेत. (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu Serial Off Air)




