बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गुप्ते तुम्ही शो सोडून द्या…”, ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमावर प्रेक्षकांची नाराजी, कमेंट करत म्हणाले, “किती वाईट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 6, 2023 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avdhoot Gupte Troll

“गुप्ते तुम्ही शो सोडून द्या…”, ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमावर प्रेक्षकांची नाराजी, कमेंट करत म्हणाले, "किती वाईट…"

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर सध्या सुरु असणारा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम. गायक अवधूत गुप्ते याचा हा कार्यक्रम असून आजवर या कार्यक्रमाने साऱ्या रसिक प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे राजकारणी आले. त्यामुळे मध्यंतरी हा कार्यक्रम ट्रोल होत होता. या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त राजकारण्यांनाच बोलवलं जातं असं म्हणत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. (Avdhoot Gupte Troll)

त्यांनतर मात्र या कार्यक्रमामध्ये कलाकार मंडळींना बोलावून ही बाजू सांभाळली गेली. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे , वंदना गुप्ते यांसारख्या कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आता मात्र कार्यक्रमाचा दर्जा खालवला असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी कार्यक्रमाला उचलून धरलं आहे.

आणखी वाचा – “…पण मी माझ्याच भाषेत बोलणार” मराठी भाषेच्या अभिमानाबाबत अजय पुरकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “समोरच्याला…”

कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये राजकारणी अभिजीत बिचुकले पाहुणे म्हणून उपस्थिती लावताना दिसणार आहेत. परंतु त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं प्रेक्षकांना आवडलेलं दिसत नाही. कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये अभिजित बिचुकले यांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये अवधूत गुप्तेला उत्तर दिली असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली आहे. त्यांना या कार्यक्रात बिचुकले आलेले काही आवडलेलं नाही. नेटकऱ्यांनी व प्रेक्षकांनी कमेंट करत नाराजी दर्शविली आहे.

View this post on Instagram

A post shared by ‘खुपते तिथे गुप्ते’ (@ekviraproductions)

आणखी वाचा – आई-बाबा जेवणाची ऑर्डर घेतात, चाळीत राहते अन्…; ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीने सांगितलेली ‘ती’ आठवण

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “अर्रर…किती वाईट दिवस आले आहेत गुप्तेवर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कार्यक्रमाचा दर्जा घालवू नका.” तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “डोक्यावर पडले आहेत का झी वाले!?” तर एका युजरने कामनेत करत म्हटलं आहे की, “गुप्ते तुम्ही शो सोडून द्या…” अशाप्रकारे अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अवधूत गुप्ते व या कार्यक्रमाला ट्रोल केलेलं पाहायला मिळतंय.

Tags: abhijeet bichukaleavdhoot gupteentertainmentkhupate tithe guptezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Next Post
Suvrat Joshi On Veggies And Grocery Shopping

"मला कितीही लोक ओळखू देत, माझ्या आनंदासाठी मी…", ‘ताली’ फेम सुव्रत जोशीची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "लोक श्रीमंत झाल्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.