कलाक्षेत्रात अनेक जोडपी अशी आहेत जी त्यांचा संसार सांभाळून सिनेसृष्टीत काम करत आहेत. वेळेचं नसलेलं बंधन, शूटिंगच्या वेळा, दिवस रात्र असलेलं शुटिंग आणि शूटिंगसाठी करण्यात येणारा प्रवास या साऱ्या गोष्टींमध्ये कलाकार भरडला जातो. मात्र हा त्यांचा स्ट्रगल सुरु असताना त्यांना घराकडे ही लक्ष देणं भाग असतं. असंच सिनेविश्वातील काम आणि संसार सांभाळणाऱ्या कलाकारांबद्दल बोलायचं झाल्यास एक नाव आवर्जून घेता येईल ते नाव म्हणजे अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ. (ashok saraf shares incidence)
घर, संसार सांभाळून दोघांनी सिनेविश्वात आपलं स्थान कायम ठेवलं. शिवाय उत्तम आई वडील म्हणून ही त्यांचं उदाहरण देता येईल. निवेदिता यांनी अनिकेत झाल्यानंतर सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला. आई म्हणून वा पालक म्हणून आपल्या बाळाचं व्यवस्थित संगोपन व्हायला हवं या हेतूने त्यांनी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. असं नाही आहे की निवेदिता यांनी अनिकेत झाल्यावर काम केलंच नाही, अनिकेत झाल्यावर सुरुवातीला त्यांनी श्रीमंत नाटक केलं, शिवाय माझा छकुला हा मराठी तर किंग अंकल हा हिंदी सिनेमा केला.
पाहा का व्हायची निवेदिता आणि अनिकेत यांची भांडणं (ashok saraf shares incidence)
पण हे करताना अनिकेत कडे दुर्लक्ष होतंय असं वाटून करत असलेलं काम त्यांना पटत नव्हतं. आणि त्या नंतर निवेदिता यांनी सिनेसृष्टीपासून काहीसा ब्रेक घेतला. मात्र त्यांनी पुन्हा कामाला का सुरुवात केली या मागचा किस्सा अशोक मामांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकात सांगितला आहे, चला तर जाणून घेऊया नेमका काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.(ashok saraf shares incidence)
याबाबत बोलताना मामा म्हणाले आहेत की, अनिकेत झाल्यांनतर निवेदिता काम करत होती, पण ते तिच्या मनाला पटत नव्हतं, तिनं पुन्हा कामाला का सुरुवात केली हे मात्र सांगण्यासारखं आहे. अनिकेत आठवीला असताना निवेदिताची आणि त्याची इतकी भांडणं व्हायला लागली की मी म्हटलं, ‘एक तर तू त्याच्या अभ्यासातून बाहेर पड किंवा मी त्याला कुठेतरी हॉस्टेलमध्ये ठेवतो. नाहीतर मी जाऊन राहतो कुठेतरी.'(ashok saraf shares incidence)
हे देखील वाचा – ‘काम बंद कर आणि घरी बस’ म्हणत अशोक मामांनी निवेदिता यांना भरला दम
निवेदिता ज्या पद्धतीनं त्याचा अभ्यास घेत होती ते बघणं अशक्य होतं. सातवीपर्यंत अनिकेत अगदी सगळं ऐकणारा मुलगा होता. आठवीत तो एकदम बदलला. त्याची स्वतःची मतं तयार झाली. तो वाद घालू लागला. त्याच दरम्यान प्रतिमा कुलकर्णीनं निवेदिताला नाटकात काम करण्याविषयी विचारलं आणि तिनं ते स्वीकारलं. अशा रीतीनं निवेदिता पुन्हा काम करायला लागली.