मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aali Mothi Shahani Teaser

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Aali Mothi Shahani Teaser : लहानपणी ‘कधी एकदा मोठे होतो’ असं वाटणं स्वाभाविकच आहे! मात्र एखाद्या चिमुकलीने आपली ही इच्छा चक्क गणपती बाप्पाकडे व्यक्त केली आणि ती इच्छा पूर्णही झाली तर? अशीच एक गोड, मजेशीर आणि रंजक कल्पना घेऊन ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमधून समोर आलेल्या या अनोख्या प्रसंगामुळे चित्रपटाच्या पुढच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘मला मोठं व्हायचंय’, अशी इच्छा मनात असलेली एक चिमुकली गणपती बाप्पासमोर आपली इच्छा व्यक्त करते. आपण मोठं झाल्यावर आपल्याला हवं ते करता येईल, अशी तिची निरागस समजूत असते. त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी ती बाप्पाकडे गोड साकडं घालते.

सोबतच हृता दुर्गुळेही मनमुराद आयुष्य जगताना दिसत आहे. त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे, याची उत्सुकता वाढते. खरंच या चिमुकलीची इच्छा पूर्ण झाली आहे का? बाप्पाच्या या चमत्कारानंतर तिच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? हे प्रश्न टीझर पाहिल्यानंतर नक्कीच पडतात. टीझरमध्ये हृता दुर्गुळेसोबत सारंग साठ्येही दिसत आहे. या दोघांची नेमकी भूमिका काय असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या दोघांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून एक हलकीफुलकी, मनोरंजक आणि वेगळी गोष्ट पाहायला मिळणार असल्याचे टीझरमधून जाणवते.

आणखी वाचा – कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची कल्पना ही अगदी साध्या आणि निरागस इच्छेतून पुढे जाते. लहानपणी मोठं व्हावंसं वाटतं आणि एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून देवाकडे मागणं मागतो, या भावनेत एक वेगळीच गंमत आहे. त्यातून पुढे काय घडतं आणि त्या इच्छेचे काय परिणाम होतात, हे या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने मांडलं आहे.” निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे यांच्या म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची गोष्ट ऐकतानाच तिच्यातला गोडवा आणि गंमत आम्हाला भावली. एका छोट्या मुलीची इच्छा जर खरंच पूर्ण झाली तर त्यानंतर काय काय घडू शकते, ही कल्पनाच खूप मजेशीर आहे. टीझरमध्ये आम्ही कथेचा एक छोटासा भाग दाखवला आहे. हृता – सारंगच्या व्यक्तिरेखांमधून ही गोष्ट आणखी रंगतदार होते. या कथेत पुढे काय होतं, हे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर ठरेल.”

आणखी वाचा – पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क प्रस्तुत ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: Aali Mothi Shahanientertainmentmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.