अनेक कलाकार आणि त्यांच्या प्रेमकहाण्या पडद्यावर दिसतात तशाच खऱ्या आयुष्यात ही असतात असं फार कमी वेळा घडत. असाच एक योगायोग खऱ्या आयुष्यात घडला होता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या प्रेमकहाणीत. अशोक सराफ यांच्या घरी पहिल्यांदा निवेदिता सराफ कधी आल्या आणि या मध्ये अशोक सराफ यांच्या आईचा संबंध होता जाणून घेऊयात इट्स मज्जाच्या जपलं ते आपलं या भागात.(Nivedita Ashok Saraf)
अशोक सराफ यांच्या दुर्दैवी कार अपघातात त्यांच्या आईचा अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं. त्या नंतर अशोक सराफ यांनी स्वतःला सावरत पुन्हा जोरदार कमबॅक केला. आईच्याजाण्यानंतर अशोक सराफ यांच्या आयुष्यात आलेली एक व्यक्ती म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. ज्यांनी चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्या प्रियसीचं काम करता करता खऱ्या आयुष्यात ही त्यांच्या प्रेमात पडल्या.
निवेदिता या अशोक यांच्या घरी पहिल्यांदा घरी कधी आल्या बाबत मामानी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. अशोक सराफ म्हणाले ज्यावेळी निवेदिता सराफ नाट्य साहित्य संघात होत्या त्यावेळी एका कार्यक्रम दरम्यान त्या अशोक सराफ यांच्या गिरगावातील घरा जवळ गेल्या होत्या. साहित्य संघटनेतील काम संपल्यावर निवेदिता अचानक अशोक सराफ यांच्या घरी पोहचल्या. त्याच दिवशी अशोक सराफ यांच्या आईचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना वाटलं आईनेच निवेदिताला आज घरी पाठवलं असावं.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अशोक सराफ आणि निवेदिता ही जोडी पुढे अनेक चित्रपटांमध्ये दिसली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दना दन अशा अनेक चित्रपटात या दोघांनी काम केलं आहे. अशोक मामांनी प्रेमाबद्दल सांगताना ते म्हणले की आमचं लग्न जुळवण्यात पुढाकार घेतलेला तो अभिनेते सचिन पिळगावकर यांनी. सध्या अशोक मामांना त्यांच्या सिनेप्रवासाबद्दल मानाचा जीवनगौरव पुरस्कार बहाल करण्यात आला.(Nivedita Ashok Saraf)
हे देखील वाचा – अशोक मामा आणि निवेदिता यांच्या लव्हस्टोरीमध्ये आधीच घडला होता ‘DDLJ’ मधला तो सीन
जुळून आलेल्या घटनेवरून अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या लग्नाला अशोक सराफ यांच्या आईचा हा एकप्रकारे आशीर्वादच होता असं म्हणायला हरकत नाही.