स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. असं असताना मालिकेत आता अनेक टर्निंग पॉईंट आले आहेत. या मालिकेतील कथानक आणि मालिकेतील कलाकारांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतेय. मालिकेत सध्या गोंधळ सुरु असलेला पाहायला मिळतोय.(Madhurani Prabhulkar Story)
त्यात मधुराणी ही कवितेचं पान या कार्यक्रमासाठी परदेशात गेली आहे, असं असल्याने मालिकेच्या कथानकात ही बदल करण्यात आला असून मालिकेतूनही ती परदेशात गेल्याच दाखवण्यात आलं आहे. अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही मालिकेतून ब्रेक घेत तिच्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियाला गेली आहे.
पाहा नेटकऱ्यांनी का घातलंय अरुंधतीला साकडं (Madhurani Prabhulkar Story)
अरुंधतीने मालिकेतून जेव्हा पासून ब्रेक घेतलाय तेव्हापासून मालिकेत गोंधळ सुरु असलेला पाहायला मिळतोय. आणि या सर्व प्रकारचं निरीक्षण करून थेट मालिकेच्या चाहत्यांनी आता अरुंधतीच्या पोस्टवर कमेंट करून तिला मालिकेत परत येण्यासाठी साकडं घातलं आहे. मधुराणी ही तिच्या कवितेचं पान या कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलिया येथे गेली आहे. सोबत तीच कुटुंब देखील आहे. तेथे जाऊन विविध जागांचे फोटोज, व्हिडीओज मधुराणीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत.(Madhurani Prabhulkar Story)
अशातच मधुराणीने ऑस्ट्रेलिया येथील एका हॉटेलमध्ये प्रॉन्स लाक्सा खातानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत तिला लवकर मालिकेत परत येण्याची विनंती केली. एका नेटकऱ्याने लिहिलं, “अरुंधतीताई लवकर ये इकडे. समृद्धीमध्ये खूप घोळ होत आहेत. तुझी इकडे खूप गरज आहे.” तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलंय, “ये बाई लवकर… इकडे देशमुखांच्या घरात नुसता गोंधळ चालू आहे.”(Madhurani Prabhulkar Story)
हे देखील वाचा – देशमुखांच्या घरी चोरी-ईशाचा जीव धोक्यात?
तर आणखी एकाने लिहिलं, “डिश चांगली आहे पण मधुराणी लवकर मालिकेत ये. आई कुठे काय करते मालिकेत तुझी खूप वाट पाहात आहोत. तू नाहीस तर मालिकेत खूप कंटाळवाणा ट्विस्ट सुरू आहे. जितक्या शक्य असेल तितक्या लवकर ये.” अशा कमेंट करत नेटकऱ्यानी अरुंधतीला मालिकेत पुन्हा येण्यासाठी आग्रह धरला आहे.