प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती जितकी जवळची असते त्याचप्रमाणे काहींच्या आयुष्यात प्राण्यांना अधिक प्राधान्य असलेलं पाहायला मिळतं. आज जवळपास प्रत्येक जण हा प्राणी प्रेमी झाला आहे. आणि या मूक प्राण्यांवर अनेक कलाकार देखील प्रेम व्यक्त करतात. विशेषतः कलाकार मंडळी त्यांच्या पेटबरोबरचे अनेक फोटोस, व्हिडीओस शेअर करत असतात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे निवेदिता सराफ. निवेदिता सराफ यांच्या घरी एक पेट तो त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. म्हणून निवेदिता सराफ नेहमी त्यांच्याबरोबरचे फोटो व्हिडीओ शेअर करतात. (Tejashri Pradhan On Ashok Saraf Pet)
अशातच निवेदिता सराफांचा पेट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने दिवाळीनिमित्त नुकतीच सराफांच्या घरी हजेरी लावली होती. अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या भेटीदरम्यानचे काही फोटो तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने अशोक सराफ, निवेदिता सराफ यांचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने निवेदिता सराफ यांच्या पेटबरोबरचा ही फोटो शेअर केला.
तेजश्रीने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. यांत तेजश्रीने निवेदिता ताईंच्या पेटबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तेजश्री पेटबरोबर दिसत असली तरी त्या पेटच्या नावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “सनी अनिकेत अशोक सराफ बरोबर” असं कॅप्शन दिलं आहे. यावरून निवेदिता सराफांच्या पेटचं नाव सनी असल्याचं समोर आलं आहे.
निवेदिता सराफ यांचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. मागे काही दिवासांपूर्वी त्यांनी त्यांच्या सनी वाढदिवसही साजरा केला होता. वाढदिवसाचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत निवेदिता सराफ,अशोक सराफ व सनी पाहायला मिळत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी डोक्यात टोपी आणि घरी खास डेकोरेशनही केलेलं दिसलं.