दिवाळी सणानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अशातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही चाहत्यांसह दिवाळी सणानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ता नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. अशातच प्राजक्ता दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या खास पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यंदाची दिवाळी प्राजक्ताने तिच्या कुटुंबाबरोबर घरीच साजरी केली आहे. (Prajakta Mali On Diwali)
प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावरून चाहत्यांसह तिचं हटके फोटोशूट शेअर करत असते. अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळीने आपल्या निखळ सौंदर्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजवर प्राजक्ताने मराठी मालिका, चित्रपट अशा अनेक माध्यमातून अभिनय साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. याशिवाय प्राजक्ताला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ते हास्यजत्रेतील तिच्या निवेदकाच्या भूमिकेमुळे.
प्राजक्ताने दिवाळीनिमित्त दिवाळी साजरी केल्याचे पाच वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. याखाली कॅप्शन देतं तिने म्हटलं आहे की, “सण दीपावली संपूच नये असं वाटतं. (फोटो दुसरा- यावेळी थेट भारती हॅास्पिटलच्या आयुर्वेद सेंटरमध्ये जाऊन भाच्यांना अभ्यंग घडवले) अभ्यंग, शॉपिंग, चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला, जेवण, भाचीचा दिवाळी अभ्यास. आत्याची बकेट लिस्ट झाली पूर्ण. भाच्यांचाहट्ट, बालहट्ट म्हणून दोन फुलबाजेही उडवले. कुटुंब. सालाबादप्रमाणे फराळ खाऊन १ किलो वजनही वाढलंय”.
दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्राजक्ताने भाच्यांसह वेळ घालवलेला पाहायला मिळतोय. प्राजक्ता फिटनेस फ्रिक आहे हे सर्वांनाच माहित आहे. प्राजक्ताने मात्र यंदाच्या दिवाळीत फराळ खाल्लेला दिसतोय आणि त्यामुळे तिचं वजनही वाढलेलं पाहायला मिळतंय. चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ध्यानधारणा करताना नेहमीच पाहायला मिळते. प्राणायाम, योग, ध्यानधारणा, संगीत, सात्विक जीवन, सात्विक जेवण, पंचकर्म, निसर्ग या गोष्टींना ती अधिक प्राधान्य देते. आणि म्हणूनच तिने तिच्या भाच्यांना थेट भारती हॅास्पिटलच्या आयुर्वेद सेंटरमध्ये जाऊन अभ्यंग घडवले असल्याचंही म्हटलं आहे.