शनिवार, डिसेंबर 9, 2023
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

लक्ष्मीपूजनाला सुभेदारांच्या घरात होणार प्रतिमाची एंट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट, तर सायलीच्या आयुष्यात घडणार…

Majja WebdeskbyMajja Webdesk
नोव्हेंबर 15, 2023 | 1:13 pm
in Television Tadka
google-news
tharla tar mag serial new promo pratima will visit subhedar house on the occasion of diwali

लक्ष्मीपूजनाला सुभेदारांच्या घरात होणार प्रतिमाची एंट्री; मालिकेत येणार नवा ट्विस्ट, तर सायलीच्या आयुष्यात घडणार...

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter

‘ठरलं तर मग’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका अव्वल स्थानावर कायम असते. मालिकेत सध्या दिवाळीनिमित्त खास भाग दाखवले जात आहे. सायली-अर्जुनची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे मालिकेत सध्या आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष वेधून घेतात. अशातच मालिकेत पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट येणार असलायचं समोर आलं आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. (Tharla Tar Mag Serial New Promo)

या नवीन प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, लक्ष्मीपूजनावेळी प्रतिमा सुभेदारांच्या घरी येऊन पोहोचते. इतक्यात सायलीला कोणीतरी आल्याचा भास होतो आणि ती पळत दरवाज्यापर्यंत जाते. तेवढ्यात प्रतिमाच्या पिशवीतून एक लक्ष्मीचं नाणं पडतं आणि ते घरंगळत रांगोळीवर जातं. सायली जोपर्यंत घराबाहेर जाते, तोपर्यंत प्रतिमा निघून गेलेली असते. मात्र तिला ते नाणं सापडतं. त्यानंतर सायली घरामध्ये येऊन त्या नाण्याविषयी सांगते. पूर्णाआजीला ते लक्ष्मीचं नाणं पाहिल्यावर प्रतिमाची आठवण येते आणि ती हे नाणं प्रतिमाचं असल्याचं घरच्यांना सांगते.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – “दादा मला एक वहिनी आण…”, ओंकार भोजनेच्या लग्नाबाबत नम्रता संभेरावचं भाष्य, म्हणाली, “माझ्या भावाला…”

दरम्यान मालिकेत सुभेदारांकडे दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा केला असल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या उत्साहाने सगळेजण एकत्र आलेले पाहायला मिळत आहे. पूर्णाआजी सायलीसह सर्वांना फराळ भरवते. दुसरीकडे प्रतीमा कुसुमसह फराळाची तयारी करते. अर्जुन-सायलीही एकमेकांना फराळ भरवतात. तर प्रतिमा फराळाचा स्टॉल लावून विकत असते. तिथे नेमकी तन्वी पोहोचते आणि ती देखील प्रतिमाकडून फराळ विकत घेते. आणि तो फराळ स्वत: बनवला असे घरी व पूर्णाआजीला सांगणार असते. तर हे सारं करताना कुसुम प्रियाला पाहते. असे आतापर्यंत दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा – राहुल वैद्य व दिशा परमारच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात बारसं, मुलीचं नाव ठेवलं…

मालिकेत सर्वांपासून आपली ओळख लपवून फिरत असलेली प्रतिमा आता सुभेदारांच्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहे. अशातच सुभेदारांच्या घरात तिची एंट्री होणार का? मालिकेत आता कोणतं नवीन वळण येणार? हे जाणून घेणं चाहत्यांना उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • Facebook
  • Whatsapp
  • Telegram
  • Twitter
Tags: amit bhanushalijui gadkarimarathi entertainmentMarathi newsTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

london misal fame actress ritika shrotri appreciated to rutuja bagwe for her descion in interview)
Marathi Masala

ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्…; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, “पहिलाच चित्रपट तरीही…”

डिसेंबर 9, 2023 | 12:19 pm
Pooja Sawant New Post
Marathi Masala

सासरच्या मंडळींसह परदेशात गेली पूजा सावंत, होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली, “माझं आयुष्य…”

डिसेंबर 9, 2023 | 12:12 pm
Hemangi Kavi Answers To Trollers
Marathi Masala

“झिम्मा २ किती वेळा पाहिला?” हेमांगी कवीला नेटकऱ्याने डिवचताच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आपण तुलना करण्यातच…”

डिसेंबर 9, 2023 | 11:25 am
Amruta Phadke mom Wedding
Television Tadka

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने केलं दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली, “हा निर्णय घ्यायला हिम्मत आणि…”

डिसेंबर 9, 2023 | 10:39 am
Next Post
Ankita Lokhande talks about her breakup with Sushant Singh Rajput

"अडीच वर्ष त्याची वाट पाहिली पण…", सुशांत सिंह राजपूतबरोबरच्या नात्यावर अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा, म्हणाली, "आईने आमचे फोटो फाडले अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Trending

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist