मंगळवार, जून 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला हिला जन्मच द्यायचा नव्हता”, भारती सिंहच्या आईचा खुलासा, अभिनेत्रीही रडली, तिसरीही मुलगीच म्हणून…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 8, 2025 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bharti singh struggle

“मला हिला जन्मच द्यायचा नव्हता”, भारती सिंहच्या आईचा खुलासा, अभिनेत्रीही रडली, तिसरीही मुलगीच म्हणून...

कॉमेडी क्वीन हा मानाचा किताब इंडस्ट्रीने सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या शिरपेचात रोवला ती म्हणले भारती सिंह. भारतीचं नाव घेताच अनेक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. ती प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवते. विविध कॉमेडी शोमधून तिने आपलं काम उत्तम करत कलाक्षेत्रात स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं. भारती इथवरच थांबली नाही तर तिने सुत्रसंचालनही करायचं ठरवलं. छोट्या पडद्यावरील रिएलिटी शोची होस्ट म्हणूनही भारतीने काम केलं. पती हर्ष लिंबाचीयाबरोबरही तिने सुत्रसंचालन केलं. भारती सुत्रसंचालन करणार म्हणजे धमाल असणार हे ठरलेलं. इतकं यश मिळवणं तिच्यासाठी काही सोप नव्हतं. भारती तिच्या स्ट्रगलबाबत बोलतेच. पण आता तिच्या आईनेही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Bharti singh struggle)

भारती अगदी शुन्यातून इथवर पोहोचलेली अभिनेत्री आहे. आई घरकाम करताना तिने पाहिलं आहे. इतकंच काय तर जिथे आई काम करायची त्यांच्या घरातल्या शिळ्या अन्नावर ती व तिची भावंडं मोठी झाली आहेत. खरं तर भारती तिच्या आई-वडिलांना नकोच हवी होती. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसले. पण तिच्या आईनेच याबाबत सांगितलं आहे. ‘लाफ्टर शेफ’च्या दुसरं सीझन जोरदार सुरु आहे. या शोमध्ये भारतीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आणखी वाचा – “माझ्यासाठी अशा गोष्टी तुच्छ”, रितेश देशमुख-प्रीती जिंटाच्या व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली जिनिलीया देशमुख, नक्की काय घडलेलं?

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान भारती-हर्षचं संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होतं. भारतीच्या आईने एक आठवण सांगितली. राहुल वैद्यने भारतीच्या आईला विचारलं की, आई तुम्ही भारतीला काय खाऊन जन्मला घातलं?. यावेळी भारतीची आई म्हणाली, “भारती तिसरी मुलगी होती. त्यामुळे ही आम्हाला होऊच नये असं वाटत होतं. त्यामुळे मी खूप काय काय खाल्लं, धावली. पण काहीच झालं नाही. डॉक्टर व नर्स यांनीही भारतीला काही सांभाळलं नाही. मीच तिचा सगळा सांभाळ केला”. हे ऐकून भारतीच्याही डोळ्यात पाणी आलं. तर कृष्णा अभिषेकने लगेचच “डॉक्टरांनाही ही जन्मलेली नको होती” असं गमतीशीर अंदाजात म्हटलं.

आणखी वाचा – विमानतळावर रडतच आली नोरा फतेही, जवळच्या व्यक्तीच्या निधनाने धक्का, बॉडीर्गार्डने चाहत्याला धक्का मारला अन्…

स्टेजवर भारतीचा जोरदार वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतीचे सासू-सारे, आई आणि इतर मंडळी उपस्थित होते. कृष्णाने भारतीच्या सासऱ्यांसहही धमाल मस्ती केली. भारती हे सगळं पाहून भारावून गेली. अशाप्रकारचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन कधीच झालं नव्हतं अशा भावना भारतीने व्यक्त केल्या. शोमध्ये भारतीचा लेक गोलाही आला होता. यावेळी त्याला सगळ्यांनी घेरलं. भारती-हर्ष बरोबरच त्यांच्या कुटुंबियांसाठी हा सुंदर क्षण होता.

Tags: Bharti Singhbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
bobby darling on mother

“माझ्यामुळेच आईचा मृत्यू झाला”, बॉबी डार्लिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “तिचे दागिने चोरुन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.