Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : प्रसाद जवादे -अमृता देशमुख,सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्या विवाहबंधनात अडकताच या पाठोपाठ आणखी दोन जोड्या बोहोल्यावर चढणार आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर, तसेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी. अशातच स्वानंदी व आशिष यांच्या मेहंदी सोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत. स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्यातील मज्जा मस्तीचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
‘आमचं ठरलं’ असं म्हणत स्वानंदी आशिष यांनी एकत्र फोटो शेअर करत सोशल मीडियावरून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून सगळयांच्या नजरा स्वानंदी व आशिष यांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या होत्या. मात्र प्रेमाची कबुली दिल्यानंतर काही दिवसांतच या जोडीने अगदी थाटामाटात साखरपुडा समारंभ उरकला. यांनतर आता स्वानंदी व आशिष यांची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्वानंदी व आशिष यांच्या मेहंदीसोहळ्यातील खास फोटो समोर आले आहेत. स्वानंदीने लाल रंगाचा परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. तर आशिषने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. स्वानंदी व आशिषच्या मेहंदीसाठी करण्यात आलेली सजावट अधिक लक्षवेधी होती. त्यांच्या हळदी सोहळ्यातील आकर्षक सजावटीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी रोमँटिक फोटो पोज देत त्यांनी काढलेले फोटो लक्षवेधी ठरत होते. या फोटोंमधील स्वानंदीच्या हातावरील नक्षीदार मेहंदीनेही लक्ष वेधून घेतलं होतं.
स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम गायिका देखील आहे. अभिनयासह स्वानंदीने कायमच तिची गायनाची आवडही जोपासली. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लेक स्वानंदी टिकेकर लवकरच आता विवाहबंधनात अडकणार आहे. तर आशिष हा देखील पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक रिऍलिटी कार्यक्रमातून त्याने त्यांच्या गायनाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे.