सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : मेहंदी रंगली गं! स्वानंदी टिकेकरच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो पाहिलेत का? रोमँटिक पोज देत शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 24, 2023 | 8:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage Marathi News

स्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी यांचे लग्न

Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : प्रसाद जवादे -अमृता देशमुख,सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्या विवाहबंधनात अडकताच या पाठोपाठ आणखी दोन जोड्या बोहोल्यावर चढणार आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर, तसेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी. अशातच स्वानंदी व आशिष यांच्या मेहंदी सोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत. स्वानंदीच्या मेहंदी सोहळ्यातील मज्जा मस्तीचे फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

‘आमचं ठरलं’ असं म्हणत स्वानंदी आशिष यांनी एकत्र फोटो शेअर करत सोशल मीडियावरून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तेव्हापासून सगळयांच्या नजरा स्वानंदी व आशिष यांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या होत्या. मात्र प्रेमाची कबुली दिल्यानंतर काही दिवसांतच या जोडीने अगदी थाटामाटात साखरपुडा समारंभ उरकला. यांनतर आता स्वानंदी व आशिष यांची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – आकर्षक सजावट, भव्य रोषणाई अन्…; मेहंदीसाठी स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगबग सुरु, व्हिडीओ आला समोर

View this post on Instagram

A post shared by Swanandi ???? (@swananditikekar)

स्वानंदी व आशिष यांच्या मेहंदीसोहळ्यातील खास फोटो समोर आले आहेत. स्वानंदीने लाल रंगाचा परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. तर आशिषने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. स्वानंदी व आशिषच्या मेहंदीसाठी करण्यात आलेली सजावट अधिक लक्षवेधी होती. त्यांच्या हळदी सोहळ्यातील आकर्षक सजावटीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी रोमँटिक फोटो पोज देत त्यांनी काढलेले फोटो लक्षवेधी ठरत होते. या फोटोंमधील स्वानंदीच्या हातावरील नक्षीदार मेहंदीनेही लक्ष वेधून घेतलं होतं.

आणखी वाचा – गौतमीच्या लग्नाआधीची लगबग सुरु, देशपांडे सिस्टर्सचा फोटो आला समोर, नक्षीदार मेहंदीवर खिळल्या नजरा

स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम गायिका देखील आहे. अभिनयासह स्वानंदीने कायमच तिची गायनाची आवडही जोपासली. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लेक स्वानंदी टिकेकर लवकरच आता विवाहबंधनात अडकणार आहे. तर आशिष हा देखील पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक रिऍलिटी कार्यक्रमातून त्याने त्यांच्या गायनाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे.

Tags: ashish kulkarniswanandi tikekarswanandi tikekar and ashish kulkarni weddingswanandi tikekar mehandi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Tejaswini Pandit On Jyoti Chandekar

"पुर्णा आजी कुठे आहे?", तेजस्विनी पंडितने केला आईच्या तब्येतीबाबत खुलासा, म्हणाली, "ती आजारी होती, दोन आठवडे ICUमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.