Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार आपल्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशातच आता आणखी एका गायक-गायिका जोडीचे लग्न होणार आहे. ही जोडी म्हणजे स्वानंदी टीकेकर व आशिष कुलकर्णी.
स्वानंदी टीकेकर व आशिष कुलकर्णी ही जोडी गेले काही दिवस त्यांच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अशातच लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वानंदीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ शेअर केला होता. अशातच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नानिमित्त सजावट केलेली दिसून येत आहे.
आणखी वाचा – फुलांची सजावट अन् गुलाबी रंगाचा पेहराव; गौतमी देशपांडेच्या मेहंदी लूकने वेधलं लक्ष, फोटो आले समोर
या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नासाठी खास मंडप सजवल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर आकर्षक रोषणाई केलेली दिसत आहे. त्याचबरोबर मंडपाच्या दाराबाहेर एक मोठी फुलदणी ठेवलेली दिसत आहे. तर दारावर सुंदर नक्षीकाम असलेल्या छत्र्यादेखील सजवून ठेवल्या आहेत. सुंदर, आकर्षक फुलांनी व दिव्यांनी स्वानंदी व आशिष यांच्या लग्नाचा मंडप सजल्याचे दिसत आहे. त्यांचा हा मंडपाचा खास थाटमाट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वानंदी-आशिष यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडादेखील संपन्न झाला होता. अखेरीस त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून त्यांचे अंके चाहते या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.