Arijit Singh Retirement : बॉलीवूडच्या संगीतविश्वाला हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी गायकांपैकी एक असलेल्या अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे हा निर्णय सर्वांसमोर आला आहे, त्यानंतर चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या ३८व्या वर्षी, आणि कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना अरिजीत सिंग असा निर्णय घेईल, याची कुणालाही अपेक्षा नव्हती.
अलीकडच्या काळात अरिजीतने मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये आपला आवाज दिला होता. सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील ‘मातृभूमी’ हे गाणे तसेच ‘बॉर्डर २’ मधील ‘घर कब आओगे’ हे भावनिक गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे त्याच्या पुढील प्रोजेक्ट्सबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र, अनेक ऑफर्स असूनही अरिजीतने यापुढे कोणतेही नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (Arijit Singh Retirement)
आणखी वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

२७ जानेवारी रोजी त्याने आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर या निर्णयाची माहिती दिली. या निर्णयामागील कारणांबद्दल बोलताना अरिजीतने सांगितलं की, हा निर्णय अचानक किंवा एका घटनेमुळे घेतलेला नाही. पुढे त्याने म्हटलं, “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत तुम्ही मला दिलेल्या सर्व प्रेम आणि आदराबद्दल माझ्या मनापासून धन्यवाद. मला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की मी आता पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाही. मी हा अध्याय संपवत आहे. हा एक कमाल प्रवास होता.” अरिजित सिंग पुढे लिहिले, “मी खरोखरच भाग्यवान आहे. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे आणि भविष्यात एक लहान कलाकार म्हणून अधिक शिकण्यावर लक्ष केंद्रित करेन. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझे अजूनही काही काम अपूर्ण आहे, आणि मी ते पूर्ण करेन. त्यामुळे, या वर्षी तुम्हाला माझी काही गाणी प्रदर्शित होताना दिसतील. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी संगीत बनवणे थांबवणार नाही.” (Arijit Singh Retirement)
आणखी वाचा – “त्यांचं अकाली जाणं…”; अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाला, “ही पोकळी कधीही…”



