बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा देव चोरला…”; अजित पवारांच्या निधनाने सूरजला अश्रू अनावर, म्हणाला, “माझ्यासारख्या गरीब मुलाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 28, 2026 | 3:42 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ajit Pawar Passes Away

अजित पवारांच्या निधनाने सूरजला अश्रू अनावर

Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातादरम्यान निधन झाले आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामती विमानाने प्रवास करत होते. विमान लँडिंग आधी बरामती विमानतळाजवळील एक शेतात कोसळले. यादरम्यान अजित पवार यांचे भीषण अपघातात निधन झाले. तसेच त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीतून अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. नुकतीच ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा: “त्यांचं अकाली जाणं…”; अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाला, “ही पोकळी कधीही…”

सूरज चव्हाणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो अजितदादांना नमस्कार करताना दिसत आहे. पुढे त्याने अजित दादांचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सूरजने लिहिलं की, “मित्रांनो माझा देव चोरला आज. मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाही की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाही. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं. माझी काळजी घेतली. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही. याचं मला खूप वाईट वाटत आहे. खूप दुःख होत आहे. माझ्या आई-वडिलांतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं. मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन.” (Ajit Pawar Passes Away)

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

दरम्यान अजित पवार हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने, म्हणजेच बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी आले होते. मात्र, लँडिंग करताना विमानाला अपघात झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागली होती. (Ajit Pawar Passes Away)

आणखी वाचा: अजित पवार यांचा अपघातात मृत्यू; सायली संजीवसह अंकिता वालावलकर भावुक: म्हणाली, “तुमच्याशिवाय राजकारण अपूर्ण आहे”

Tags: Ajit Pawar DeathAjit Pawar Passes AwaySuraj Chavan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Ajit Pawar Death

“दादा जेव्हा भेटायचे तेव्हा…” निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितली अजित पवारांची हृदयस्पर्शी आठवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.