Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजित पवार मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना त्यांचं विमान कोसळलं. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह त्यांच्या समर्थकांवर देखील शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी कलाकारांनीसुद्धा पोस्टद्वारे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने अजित पवारांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. त्याने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा: अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच युगेंद्र पवारांना अश्रू अनावर ; पवार कुटुंबावर शोककळा
या पोस्टमध्ये रितेश म्हणाला, “अजित दादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी ऐकून मी अत्यंत दुःखी झालो आहे. महाराष्ट्रातील अत्यंत कर्तृत्ववान आणि प्रभावी नेतृत्वांपैकी ते एक होते. कामात हलगर्जीपणा त्यांना कधीच मान्य नव्हता; ते नेहमी आपल्या आसपासच्या प्रत्येकाला अधिक चांगलं करण्यासाठी प्रेरणा देत असत. ते कधीही शब्द फिरवून बोलत नसत, त्यांची विनोदबुद्धी अतुलनीय होती आणि संपूर्ण राज्याचं त्यांच्यावर मनापासून प्रेम होतं. त्यांचं अकाली जाणं ही राज्यासाठी मोठी हानी असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा मला योग आला आणि त्यांनी माझ्याबद्दल दाखवलेली आपुलकी व माणुसकी मी कायम स्मरणात ठेवेन.” (Ajit Pawar Passes Away)
आणखी वाचा: मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू



