शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली, ‘या’ महिन्यात घरी येणार नवा पाहुणा, कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
anushka sharma and cricketer virat kohli are expecting their second child this month AB de Villiers comment on Anushka's actress pregnancy

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली, 'या' महिन्यात घरी येणार नवा पाहुणा, कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण

एखाद्या प्रसिद्ध किंवा लोकप्रिय व्यक्तीबाबतच्या प्रत्येक अपडेट्ससाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. त्याच्याविषयी सगळेच जाणून घेणे ही चाहत्यांना कायमच आवडत असते. अशीच एका व्यक्तीविषयी जाणून घेण्यात चाहत्यांनी गेले अनेक दिवस उत्सुकता दाखवली आहे आणि ही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा. गेले काही दिवस अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहेत.

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. अद्याप अभिनेत्रीने किंवा विराट कोहलीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण विराटचा मित्र व दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने अनुष्काच्या प्रेग्नन्सीबाबत भाष्य केलं आहे. सध्या सोशल मीडियावर एबी डिव्हिलियर्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने अनुष्का-विराटच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत भाष्य केलं आहे.

AB De Villiers said, "Virat Kohli and Anushka Sharma are expecting their 2nd child, so Virat is spending time with his family". (AB YT). pic.twitter.com/qurRKnFK1q

— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 3, 2024

विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सने एका युट्यूब लाइव्हमध्ये असं म्हटलं की, “विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे, त्यामुळेच तो पहिले दोन कसोटी सामने खेळत नाही. मी सध्या इतर कशाबद्दल भाष्य करू शकत नाही. मी एवढेच म्हणेन की, होय अनुष्का-विराट लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. विराटसाठी कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. त्याने योग्य निर्णय घेतला आहे.”

आणखी वाचा – “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये बसून फक्त हसते” म्हणणाऱ्यांना सई ताम्हणकरचं चोख उत्तर, म्हणाली, “तुम्हाला जमलं तर…”

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीचे दुसरे अपत्य सप्टेंबर 2024 पर्यंत होऊ शकते. अनुष्का नोव्हेंबर 2023 मध्ये बेबी बंपसह दिसली होती परंतु लोकांनी याला अफवा म्हटले. 22 जानेवारी रोजी, विराट आणि अनुष्का रामलाला प्राण प्रतिष्ठाच्या वेळी एकत्र दिसले होते जेव्हा अभिनेत्री तिचे बेबी बंप लपवत होती.

आणखी वाचा – सई ताम्हणकरची संपत्ती किती?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिले खुलेपणाने उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”

दरम्यान, विराटया-अनुष्का ही दोघे त्यांच्या लेकीविषयी अगदीच गोपनीयता जप्त असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनुष्का-विराट यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०२१ रोजी अनुष्काने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव वामिका असे ठेवण्यात आले. त्यानंतर विराट-अनुष्काच्या दुसऱ्या अपत्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: anushka sharmaAnushka Sharma Pregnancy NewsAnushka Sharma Pregnantbollywood actressBollywood entertainment newsentertainment newsIndian cricketerPregnancy Newsvirat kohliअनुष्का शर्माअनुष्का शर्मा प्रेग्नंटअनुष्का शर्मा प्रेग्नन्सी बातमीप्रेग्नन्सी बातमीबॉलिवूड अभिनेत्रीभारतीय क्रिकेटरमनोरंजन बातमीविराट कोहली
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar And Avinash Narkar

Video : ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह जुन्या गाण्यावर रोमँटिक डान्स, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, चेहऱ्यावरील हावभाव पाहून म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.