सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह जुन्या गाण्यावर रोमँटिक डान्स, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, चेहऱ्यावरील हावभाव पाहून म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 5, 2024 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar And Avinash Narkar

Video : ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह जुन्या गाण्यावर रोमँटिक डान्स, ट्रोल नव्हे तर नेटकऱ्यांनी केलं भरभरुन कौतुक, चेहऱ्यावरील हावभाव पाहून म्हणाले...

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार जोड्या या प्रेक्षकांना विशेष भावतात. यामध्ये एका मराठमोळ्या जोडीचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ट्रेंडिंग रील, डान्स व्हिडीओ शेअर करत ते नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. (Aishwarya Narkar And Avinash Narkar)

मराठी सिनेसृष्टीतील एक एव्हरग्रीन जोडी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर. नारकर जोडीला त्यांच्या व्हिडीओवरुन अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. त्यांनी शेअर केलेल्या एखाद्या व्हिडीओला काही चाहते प्रतिसाद देतात, तर काही ट्रोलही करतात. यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी कित्येकदा भाष्य करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तरे दिली आहेत. अशातच या जोडीने एक गमतीशीर रील पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – सई ताम्हणकरची संपत्ती किती?, अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिले खुलेपणाने उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

“काय करावं?”, असं म्हणत अविनाश व ऐश्वर्या यांनी एक गमतीशीर रील पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे. बऱ्याच कलाकारांनीही या व्हिडीओवर कमेंट करत दोघांचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. ही गमतीशीर व्हिडीओ पाहता पहिल्यांदा नारकर कपलला ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला नाही. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सकारात्मक कमेंट करत दोघांना असेच गावरान रील करण्यास उत्तेजित केले आहे.

आणखी वाचा – “तुझी आई…”, लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अंकिता लोखंडेला दुःख अनावर, म्हणाली, “मी तुला…”

“असेच गावरान व्हिडीओ बनवत जा”, “तुमची जोडी खूप छान आहे, असेच एकत्र राहा”, “एव्हरग्रीन जोडी” अशा अनेक कमेंट करत दोघांचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. तसेच नारकर कपलच्या या मजेशीर रीलला भरभरुन पसंती मिळत आहे.

Tags: Aishwaraya Narkaraishwarya narkar and avinash narkaravinash narkarentertainmentmarathi actormarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Next Post
Actor Abhishek bachchan sister Shweta and niece navya wished birthday but not aishwarya rai

वडील, बहिण, भाचीने दिल्या वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा, मात्र बायकोने फिरवली पाठ, ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये पुन्हा बिनसलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.