Bigg Boss Updates : कलर्स वाहिनीवरील चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचे ‘बिग बॉस’ १७ वे पर्व हे चांगलेच गाजलेले पाहायला मिळाले. हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरात फक्त ९ स्पर्धक राहीले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक खास भेट दिली आहे. हा शोच्या अंतिम भाग होण्यापूर्वी ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करुन देणार आहे. त्यामुळे येत्या ‘फॅमिली स्पेशल’ वीकमध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी व भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान अंकिता लोखंडेच्या आईने आपल्या मुलीला शोमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंड (सुशांत सिंह राजपूत) बद्दल बोलू नकोस अशी सूचना केली आहे. अंकिता लोखंडेची आई आपल्या लेकीबरोबर संवाद साधताना पती विकीबरोबर नम्रपणे वागण्याचा सल्ला दिला. नॅशनल टीव्हीवर अशाप्रकारे त्यांची एकमेकांशी होणारी भांडणं व वाद याचा प्रेक्षकांसमोर चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – सिद्धार्थ-सईचा लिपलॉक, धमाल कॉमेडी अन्…; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?
तसेच वंदना लोखंडेने आपल्या मुलीला समजावताना असेही म्हटले की, तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलणे थांबवले पाहिजे. कारण आता विकी जैन हा तिचा नवरा आहे आणि सुशांतबद्दल तिचे हे असे सारखेसारखे बोलणे विकीला मान्य नाही. तसेच त्याच्या कुटुंबालाही ते आवडत नाही.
हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिकेची बाजी, पण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग घसरला, पाहा संपूर्ण यादी
दरम्यान, आईचे म्हणणे ऐकून अंकितानेही भविष्यात असे बोलणार नसल्याचे सांगितले आणि तिच्या या कृत्यामुळे विकीच्या घरच्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटू नये यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी भागांत विकी-अंकिताच्या नात्यात काय फरक पडणार?, अंकिता सुशांतबद्दल खरच उल्लेख करणार की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.