Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ सुरु झाल्यापासून अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या सततच्या भांडणामुळे चर्चेत आहे. या जोडीमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अनेकदा भांडणे झाली, कालांतराने ही भांडण मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळाली. अलीकडे झालेल्या भांडणात दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याबाबत ही चर्चा केली होती. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात सध्या फॅमिली विक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अंकिता व विकी या दोघांच्या आई त्यांना भेटायला आल्या होत्या.
समोर आलेल्या भागात अंकिताची आई व सासूबाई यांनी केलेला संवाद विशेष लक्षवेधी ठरला. अंकिताने तिच्या सासुसह विकीबरोबरच्या नातेसंबंधाबद्दल भाष्य केलं. अभिनेत्री म्हणाली की, “तिच्या वैवाहिक नात्यात चूक करणारी ती एकटीच नव्हती”. विकी जैनच्या आईशी बोलताना अंकिता लोखंडे भावूक झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर अंकिता लोखंडेने विकी जैनच्या आईकडे येत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
आधी विकी जैनच्या आईने अंकिता जैनशी बोलण्यास नकार दिला, पण नंतर दोघांमध्ये बोलणे झाले. अभिनेत्री तिच्या सासूला म्हणाली, “मम्मा, माझी एकटीची चूक आहे, अस नाही आहे. मला असे म्हणायचे आहे की, दोन्ही बाजूंनी गोष्टी घडल्या आहेत”. अंकिता पुढे म्हणाली, “मी घरी जशी आहे, अगदी इथेही तशीच आहे. तुम्ही माझ्याबरोबर कधीच राहिला नाहीत त्यामुळे तुम्हाला माहीत आम्ही कसे राहतो आणि विकी कसा राहतो. म्हणूनच मला हे सांगणे महत्त्वाचे वाटते की आम्ही अशीच मज्जा मस्ती करत राहतो”.
यापुढे बोलत अंकिता लोखंडे म्हणाली, “या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम होत आहे की, माझे कुटुंबीय मला समजू शकत नाही. मम्मा, मला खरंच हात जोडून तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मी माफी मागते”. दरम्यान, विकी जैनही खोलीत येतो आणि त्याच्या आईला समजावू लागतो.