गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धार्थ-सईचा लिपलॉक, धमाल कॉमेडी अन्…; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Saie tamhankar, siddharth chandekar starrer sridevi prasanna trailer released video viral on social media see the details

सिद्धार्थ-सईचा लिपलॉक, धमाल कॉमेडी अन्...; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सध्याचा मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. आत्तापर्यंत या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्लासमेट चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. मराठीतील हे लोकप्रिय कलाकार आता प्रेक्षकांच्या भेटीला नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटातून दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या टीजरने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती.

अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलरही भेटीला आला आहे. सिद्धार्थ व सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये सिद्धार्थ म्हणजेच प्रसन्नची आई त्याच्या लग्नासाठी मागे लागताना दिसते. तर सई अर्थात श्रीदेवी लग्न करायला उत्सुक असल्याची बघायला मिळत आहे. हे दोघे अरेंज मॅरेज करण्यासाठी एकमेकांना भेटतात आणि तिथून त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात होते.

View this post on Instagram

A post shared by Tips Films (@tipsfilmsofficial)

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिकेची बाजी, पण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग घसरला, पाहा संपूर्ण यादी

चित्रपटात सई म्हणजेच श्रीदेवीचे कुटुंब हे अत्यंत फिल्मी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या आजीमुळे या चित्रपटात काय नवीन ट्विस्ट येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आता प्रसन्न-श्रीदेवीचे लग्न जुळणार का? दोघे नवरा-बायको बनणार का? हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच लक्षात येईल. येत्या २ फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या उद्घाटनासाठी मराठी कलाकरांमध्ये उत्साह, शशांक केतकर म्हणाला, “१९६३ पासून रखडलेल्या…”  

टीप्स मराठी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी यांनी केली आहे. या चित्रपटात सई व सिद्धार्थ यांच्याबरोबर संजय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Tags: सिद्धार्थ चांदेकरसई ताम्हणकरश्रीदेवी प्रसन्नमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी चित्रपटentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsmarathi moviesMarathi newssaie tamhankarsiddharth chandekarSridevi Prasanna
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
ankita lokhandes mother told actress dont take a name actor sushant singh rajput see the details

Bigg Boss 17 : “विकीच्या कुटुंबाला...”, सुशांत सिंह बद्दल सतत बोलण्यावरून अंकिता लोखंडेला तिच्याच आईने टोकलं, म्हणाल्या, “तुझा नवरा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.