छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेकांच्या आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या मालिकेतील घटना, प्रसंगे, पात्र, कथा किंवा संवाद यांसारखे अनेक घटक सामान्य प्रेक्षक स्वत:बरोबर रीलेट करतात. त्यामुळे प्रत्येक घराघरांत या मालिका खूप आवडीने पाहिल्या जातात आणि प्रेक्षकांच्या बघण्यामुळे या मालिकांना लोकप्रियता मिळते. ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार त्याचबरोबर तंत्रज्ञदेखील मेहनत घेतात. या लोकप्रियतेवरच मालिकेचा टीआरपी अवलंबून असतो. अशातच नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी समोर आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जुई गडकरी व अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेले ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. मागील आठवड्याच्या टीआरपी यादीत ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानावर असून ६.८ रेटिंग मिळाले आहे आणि टीआरपीच्या यादीत या मालिकेने आपले स्थान कायम ठेवले आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आहे. या मालिकेला ६.६ रेटिंग मिळाले आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ झाली आहे. या मालिकेला ६.३ रेटिंग मिळाले आहे. याशिवाय ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीआरपीतदेखील वाढ झाली आहे.
हेही वाचा – प्रसिद्ध गायक सनम पुरीचा शाही विवाहसोहळा संपन्न, गर्लफ्रेंडसह थायलँडमध्ये केलं लग्नं, पाहा खास फोटो
दरम्यान, याच वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांच्या टीआरपीमध्ये घसरण झाली असल्याचे पहायला मिळत आहे.