टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेचे नाव आवर्जून घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती अधिक चर्चेत आहे. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने मालिका विश्वामध्ये पदार्पण केलं. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.ती सहकलाकार सुशांत सिंग राजपूतसह रिलेशनशिपमध्येही होती. सुशांतने तिला एका डान्स शोमध्ये लग्नाची मागणीही घातली होती. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. कालांतराने दोघांचा ब्रेकअप झाला आणि दोघांच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूनंतर ती खूप चर्चेत आली. (Ankita Lokhande on casting couch)
दरम्यान अंकिताने व्यवसायिक विकी जैन बरोबर लग्नबंधनात अडकली. दोघेही बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. अंकिताने नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतःच्या करिअरच्या संघर्षाची कहाणी सांगितली आहे. यामध्ये तिने कास्टिंग काऊचवर भाष्य केले आहे. तिने स्वतःला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव व्यक्त केला आहे.
अंकिता म्हणाली की, “मला लहानपणापासून अभिनेत्री बनायचे होते. त्यामुळे मी सतत ऑडिशन देत असे. त्यावेळी मी फक्त १९ वर्षांची होते आणि एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. नंतर मला चित्रपट साईन करण्यासाठी कॉल आला. मी खूप खुश झाले. मी आईला सांगितले की मी साईन करुन येते. हे सर्व इतक्या सहज कसं होतंय? हा प्रश्नही मला पडला”. पुढे ती म्हणाली की, “तो अनुभव माझ्यासाठी खूप भयंकर होता. मी हिंमत केली आणि त्याबद्दल विचारले. त्यावर समोरून उत्तर आले की मला निर्मात्याबरोबर झोपावं लागेल. मग मी म्हणाले की तुमच्या निर्मात्यांना टॅलेंटची नाही तर मुलीची गरज आहे. असं मी म्हणाले आणि तिथून निघाले”.
‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार’ या कार्यक्रमामधील सहभागानंतर अंकिताला ‘पवित्र रिश्ता’ ही पहिली मालिका मिळाली. १०१९ मध्ये तिने चित्रपटसृष्टीमध्ये कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका:द क्वीन ऑफ झासी’मधून पदार्पण केले. त्यानंतर तिने टायगर श्रॉफ,श्रद्धा कपूर व रितेश देशमुखसह ‘बागी ३’ मध्येही दिसली होती.