बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; सत्यनारायण पूजेसाठी अशी नटली पूजा सावंत, सासरकडच्या घराचीही दिसली झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 1, 2024 | 4:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding

निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; सत्यनारायण पूजेसाठी अशी नटली पूजा सावंत, सासरकडच्या घराचीही दिसली झलक

अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे. अगदी राजेशाही थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय, कलाकार मंडळी व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत हा शाही लग्नसोहळा पार पडला. पूजा सावंत हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील त्यांच्या पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूजाच्या लग्नातील तसेच लग्नापुर्वीच्या फंक्शनमधील अनेक फोटो, व्हिडीओही समोर आले. (Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding)

गेल्या काही दिवसांपासून पूजाच्या घरी लगीनघाई सुरु होती. यानंतर अगदी पारंपरिक विधींनी पूजा सावंत हिचा लग्न सोहळा पार पडला. या फोटोंमध्ये नववधूवराचा खास पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला आहे. पूजाच्या लग्नानंतर तिची सासरी पाठवणी करताना साऱ्यांना अश्रू अनावर झाले. तिची बहीण रुचिरा हिने ‘मिस यु’ असं म्हणत पूजाच्या लग्नातील फोटो शेअर केला होता. लग्नानंतर मात्र पूजा तिच्या सासरी रमलेली दिसली. पूजाच्या बहिणीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पूजाच्या सासरच्या घरातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – हळदीत मित्र-मंडळींना मिठी मारुन रडू लागली पूजा सावंत, उपस्थितांनाही अश्रू अनावर, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आज पूजाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आहे. यासाठी पूजा व सिद्धेश तयार झाले आहेत. पूजाच्या माहेरची मंडळीही तिच्या सासरी पोहोचली आहे. पूजाचे आई-वडीलही लेकीला भेटायला आले आहेत. सत्यनारायणाच्या पूजेचा आशीर्वाद घेताना ते दिसले. अगदी पारंपरिक अंदाजात ही पूजा संपन्न झाली असल्याचं दिसतंय. सत्यनारायणाच्या पूजेसाठी पूजा व सिद्धेशचा पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला.

आणखी वाचा – प्रार्थना बेहरेने बांधली पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणची लग्नगाठ, नवराही होता बरोबर, फोटो शेअर करत म्हणाली, “दोन जीवांना…”

पूजाने यावेळी निळ्या रंगाची कॉटनची साडी नेसली होती आणि त्यावर लाल रंगाची शाल घेतली होती. तर सिद्धेश यावेळी कुर्ता पायजमामध्ये दिसला. हातात हिरवा चुडा, गळ्यात मोजकेच दागिने, कानात झुमके अशा सध्या सिंपल लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. पूजा व सिद्धेशचा हा पारंपरिक लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पूजाच्या सासरच्या घराचीही झलक पाहायला मिळत आहे.

Tags: entertainmentmarathi actressPooja Sawant Siddhesh ChavanPooja Sawant Siddhesh Chavan Weddingpooja sawant wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Ankita Lokhande on casting couch

"निर्मात्याबरोबर झोपावं लागेल असं…", अंकिता लोखंडेला धक्कादायक अनुभव, अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, "मुलीची गरज…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.