‘बिग बॉस’मुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन विशेष चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस’चं १७ वं पर्व सुरु झालं असून या पर्वाची जोरदार चर्चा रंगली आहे. अंकिता व विक्की या सीझनमध्ये सहभागी होतं सुरुवातीपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिता व विकीच्या रोमँटिक फोटोंनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून ही जोडी वाद करताना दिसून आली. (Amruta Khanvilkar On Ankita Lokhande and Vicky Jain)
‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून विकी व अंकिता भांडतात दिसत आहेत. विकी अनेकदा अंकितावर आवाज चढवताना ही दिसला आहे. तसेच अंकिताने विकी तिला वेळ देत नसल्याची तक्रार केली आहे. यावरून अंकिताबरोबरच्या वर्तनामुळे अभिनेत्रीचे चाहते विकीवर प्रचंड भडकले आहेत. मात्र, हे दोघं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा खटाटोप करत असल्याचं आरोप घरातील इतर सदस्य करत आहे.
अशातच अंकिता व विकी यांचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. यांत अंकिता रडताना दिसतेय तर विकी तिला जवळ घेत तिची समजूत काढताना दिसत आहे. अंकिता व विकीचा हा एकत्र वेळ घालवतानाचा ‘बिग बॉस’च्या घरातील व्हिडीओ बऱ्याच दिवसांनी समोर आल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आईच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळतेय. तर विकी तिची समजूत काढत आहे. हा व्हिडीओ पाहून एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही अंकिताला पाठिंबा दर्शविला आहे.
या व्हिडिओमध्ये विकी बोलतोय की, तिला आठवण येतेय, ना तुला समजावू शकत, नाही तुला काही बोलू शकत, नाही तुला काही सांगू शकत, काही सांगायला गेलं तर तू आधीच्या गोष्टी बोलून मला ऐकवते. तू का रडतेय? असं विकी अंकिताला बोलतो. यावर अंकिता बोलते, मला घरी जायचं आहे. मला आईची आठवण येतेय. तेव्हा विकी तिला जवळ घेत समजावतो आणि सांगतो की, आता थोडेच दिवस आपण इथे राहणार आहोत. असं रडून चालणार नाही.”

विकी व अंकिताचा हा व्हिडीओ अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केला असून तिने या व्हिडिओवर “अंकिता तू खूप खंबीर आहेस, तुझी ही भावना मी समजू शकते. खूप प्रेम” असं म्हणत स्टोरी पोस्ट करत अंकिता पाठिंबा दर्शविला आहे. अंकिता-विकीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत “पहिल्यांदाच इतकं प्रेम दोघांमध्ये बहरलेलं पाहायला मिळतंय” अशी कमेंट केली आहे.