दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी विद्यूत रोषणाईची झगमगाट पाहायला मिळत आहे. राज्यभरातील बाजारपेठांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक जण दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्य व कपडे खरेदी करताना दिसत आहे. तसेच, काही ठिकाणी फटाक्यांची अतिशबाजीदेखील होत असून एकूणच सर्वत्र दिवाळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सर्व सामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींमध्येही यावेळी दिवाळीचा वेगळाच उत्साह दिसत असून तेदेखील या सणाच्या तयारीला लागलेले आहेत. पण काही कलाकारांनी सामाजिक भान जपत बच्चे कंपनीसह यंदाची दिवाळी साजरी केली. (Tejashri Pradhan celebrates Diwali with childrens)
लोकप्रिय वाहिनी ‘स्टार प्रवाह’चा नुकताच ‘ढिंचॅक दिवाळी २०२३’ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यानंतर वाहिनीच्या काही कलाकारांनी ‘केअर इंडिया’ फाउंडेशनच्या छोट्या मुलांसह आगळ्यावेगळ्या पद्धतीने यंदाची दिवाळी साजरी केली. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतंच ‘इट्स मज्जा’शी संवाद साधला. त्यावेळी मला इथल्या मुलांबरोबर दिवाळी साजरी करताना विशेष आनंद झाला असल्याचं म्हणाली.
हे देखील वाचा – भावाने केलेल्या केळवणात बहीण अमृता देशमुखने काय उखाणा घेतला पाहा, म्हणाली, “अभिषेक व कृतिकाने काँटिनेंटल केळवण करून…”
यावेळी ती आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली, “‘स्टार प्रवाह’ने स्तुत्य उपक्रम राबवला असून यावर्षीच्या दिवाळीला या बच्चे कंपनीसह दिवाळी साजरी करताना छान वाटत आहे. आमच्या हाताने या मुलांना त्यांचे शालेय साहित्य म्हणा, किंवा त्यांना रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी दिल्या. ही दिवाळी माझ्यासाठी खूपच वेगळी आहे आणि ही दिवाळी कायम माझ्या स्मरणात राहणारी असेल.” पुढे तिने बच्चे कंपनीसह दिवाळी साजरी केली असल्याचं सांगताना म्हणाली, “हो, मी बऱ्याचदा लहान मुलांसह दिवाळी साजरी करते. मला त्यांच्याबरोबर सण किंवा अन्य विशेष दिवस साजरा करायला नेहमी आवडतात. पण, या निमित्ताने मला यंदाची दिवाळी साजरी करायला मिळाली. आणि मला इथे येण्याची संधी मिळाली, याचा खूप आनंद होत आहे.”
हे देखील वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावच्या लेकाची स्वयंपाकघरात भलतीच करामत, आजीपासून लपवून चिमुकल्याने काय केलं पाहा
यावेळी तिने तिच्या दिवाळीच्या आठवणी सांगताना म्हणाली, “तेजश्रीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. कारण दिवाळी हा वर्षभरात साजरा होणाऱ्या मराठी सणांमधील माझा लाडका सण आहे. दिवाळीमध्ये मला खूप मज्जा येते. दिवाळीचा फराळ बनवताना किंवा तो फराळ बनतानाचा जो सुगंध दरवळतो, त्याच्या अनेक आठवणी आहेत. आमच्या लहानपणी फारसे प्रदूषण नसल्याने आम्हाला फटाके उडवण्याची सुद्धा मुभा होती. तसेच नरक चतुर्दशीच्या सकाळी पहिलं अभ्यंगस्नान करून फुलबाजी उडवायची. त्यामुळे या आठवणी माझ्यासाठी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत.” तेजश्रीची दिवाळी तिच्यासाठी नेहमीच विशेष असते.