एखादा चित्रपट चिटपटगृहांमध्ये काही काळ टिकल्यानंतर अनेकजण तो चित्रपट ओटीटी माध्यमांवर येण्याची वाट पाहत असतात. प्रेक्षकांना काही कारणास्तव चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट बघता येणे शक्य नसते. त्यामुळे प्रेक्षक तो चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत असतात. अशा अनेक चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. २०२३ हे वर्ष गाजवलेले अनेक चित्रपट आता येत्या नवीन वर्षात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. (Upcoming OTT Movies)
अॅनिमल : रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा चित्रपट ‘अॅनिमल’ हा २०२३ मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. वडील व मुलाचे प्रेम दाखवणाऱ्या या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर व बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर रश्मिका मंदाना व तृप्ती डिमरी या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १५ जानेवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

१२वी फेल : हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, बॉक्स ऑफिसवर गाजलेला ‘१२वी फेल’ हा चित्रपट येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्यावर आधारित हा चित्रपट झी-5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रांत मेंसी, मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खजा या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.

टायगर ३ : सलमान खान व कतरिना कैफचा ‘टायगर ३’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात अॅमेझोन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. पण चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता इमरान हाश्मीने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली असून रेवती, आशुतोष राणा, रणवीर शौरी, रिद्धी डोगरा व विशाल जेठवा यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

आणखी वाचा – आकर्षक सजावट, भव्य रोषणाई अन्…; मेहंदीसाठी स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगबग सुरु, व्हिडीओ आला समोर
सॅम बहादूर : टाईम्स ऑफ इंडियाच्या मते, विक्की कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट झी-5 वर प्रदर्शित होईल. या चित्रपटात विकीबरोबरच फातिमा सना शेख व सान्या मल्होत्रा या अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहेत.

आणखी वाचा – फुलांची सजावट अन् गुलाबी रंगाचा पेहराव; गौतमी देशपांडेच्या मेहंदी लूकने वेधलं लक्ष, फोटो आले समोर
अमर सिंह चमकीला : दिलजीत दोसांझ व परिणीती चोप्रा यांचा ‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. इम्तियाज अली यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर ए. आर. रहमान यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.