कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी या रिऍलिटी शो चा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.या शो मधील कलाकारांना फार मोठ्या प्रमाणवर प्रसिद्धी मिळते यात काही शंका नाही. परंतु या शो मध्ये टिकून राहण्या साठू प्रेक्षकांच्या मनात जागा बनवण्या साठी कलाकार फार मेहनत घेत असतात हे देखील तितकेच खरे आहे.(Amruta Deshmukh)
यातीलच बिग बॉस मराठी सीजन चार फेम अमृता देशमुख ही तिच्या मोहक अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. तुमचं आमचं सेम असत या मराठी मालिके मधून अमृताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.त्या नंतर तिने बऱ्याच मालिका केल्या, त्यातही फ्रेशर्स हि तिची झी युवा वरील मालिका मोठ्या प्रमाणावर गाजली त्यातील तिच्या परी देशमुख या पात्रामुळे ती घराघरात पोहोचली. छोट्या पडद्याप्रमाणे तिने स्वीटी सातारकर हा चित्रपट देखील केला आहे . स्वीटी या पात्रासाठी कॉमेडी बेस्ट एक्टरेस चा पुरस्कार देखील तिला मिळाला आहे.
पहा अमृताची नवीन पोस्ट (Amruta Deshmukh)
तर सध्या पार पडलेल्या बिगबॉस मराठीच्या सीजन ४ मध्ये अमृता वेगळ्या रूपात पाहायला मिळाली. बिग बॉस मध्ये तिचा स्पष्टवक्तेपणा प्रेक्षांकच्या चांगलाच पसंतीस पडला.प्रसाद जवादे सोबतच्या बॉण्डिंग मुळे ती बरीच चर्चेत देखील आहे.बिगबॉसच्या घराबाहेर आल्या नंतर ही प्रसाद अमृता बरयाचदा एकत्र पाहायला मिळतात.तसेच अमृता सोशल मीडिया वर हि मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिचे फोटोज प्रेक्षकांच्या मनाला कायमच भुरळ घालतात.असाच तिचा पोपटी रंगाच्या सिल्क साडी वरील फोटो तिने शेअर केला आहे.तिच्या नाजूक हावभावांमुळे ती खूपच सुंदर दिसतेय. तसेच तिच्या फोटोज वर तारीफ करू क्या उसकी जिसने तुझे बनाया,निखळ सुंदर, सुंदरी अशा अनेक कमेंट आहेत.पण त्यातील क्या केहना है असं म्हणत प्रसाद जवादे ला मेन्शन करून केलेली कमेंट लक्षवेधी ठरली आहे.प्रेक्षकांना देखील प्रसाद आणि अमृताला एकत्र पाहायला आवडते.(Amruta Deshmukh)

तर सध्या अमृता चे नियम व अटी लागू हे नाटक सुरु आहे यात संकर्षन कऱ्हाडे सोबत अमृता पाहायला मिळतेय. त्यांच्या या नाटकाला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अक्षय केळकर व समृद्धी केळकर यांच्या दोन कटिंग या शॉर्ट फिल्म च्या तिसऱ्या भागात अमृता देखील झळकणार असल्याचे त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले आहे.