महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या कार्यक्रमातील प्रत्येक स्किट इंटरेस्टिंग असतं. या मालिकेतील डायलॉग सुद्धा खूप फेमस झालेले आपण पाहतोय. या कार्यक्रमातील “मी शिवाली अवली कोवली” या स्किट च रूपांतर गाण्यात झालं. आणि या गाण्यावर अनेक जणांनी रिल्स सुद्धा बनवल्या. आता या गाण्याची भुरळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिले मेरेडिथला पडली आहे. (Shivali Avali Kohali Fad)
हे देखील वाचा: प्रसाद जवादे क्या केहना है ? अमृताच्या पोस्ट वर चाहत्याची कमेंट.
सध्या आईपीएल चा सीजन सुरु आहे. आणि मेरेडिथ हा मुंबई इंडियन्स टीमचा प्लेअर आहे. मेरिडिथने “शिवाली अवली कोवली” या गाण्यावर रील बनवली आहे. या रिलमध्ये त्याने स्वतःला “रिले अवली कोवली” असं म्हंटल आहे. त्याची ही रील मुंबई इंडियन्सच्या ऑफिशल पेजने शेअर केली आहे. त्यांनी या रील ला “रिले अवली कोवली आला रे” असे कॅप्शन दिले आहे. या रीलवर “Admin पण MHJ चा फैन आहे रे” तसेच ऍडमिन मराठी माणूस दिसतोय” अशा चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
हे देखील वाचा:‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार गेले शॉर्ट व्हॅकेशनला
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा एक विनोदी रियालिटी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी मिळून केली आहे. या कार्यक्रमात स्क्रिप्ट रायटिंग च काम आतापर्यंत प्रसाद खांडेकर, सचिन मोटे, अभिजित पवार, प्रथमेश, विनायक पुरुषोत्तम, समीर चौघुले आणि इतरजण करतात. मी “शिवाली अवली कोवली” या स्किट चे लेखन प्रसाद खांडेकरने केले होते. प्रसाद खांडेकर हा उत्तम अभिनेता तर आहेच सोबतच तो एक चांगला लेखक सुद्धा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने मोठ्या पासून छोट्या सगळ्याच मंडळींना वेड लावेल आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात तसेच अन्य देशात ही पहिला जातो. (Shivali Avali Kohali Fad)
हास्यजत्रेतील कलाकार काही आपल्याला “पोस्ट ऑफिस उघडं आहे” या मालिकेत सुद्धा पहिला मिळाले. या मालिकेत अभिनेत्री शिवाली परब, समीर सौघुले तसेच विशाखा सुभेदार या कलाकारांचा समावेश होता.