“आई कुठे काय करते” ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध मालिका असून या मालिकेतील अरुंधती हे पात्र प्रेक्षकांच्या जवळचे पात्र आहे. या मालिकेत अरुंधतीचा नवरा अनिरुद्ध याच दुसऱ्या स्त्रीवर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं होत आणि ती दुसरी स्त्री या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले साकारताना आपल्याला दिसते. (Rupali Bhosale New Photo)
रूपालीला या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. रुपाली या व्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. रुपाली तिचे रील आणि व्हिडियो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते. नुकताच तिने तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हे देखील वाचा: नम्रता, प्रसाद लवकरच गाजवणार अमेरिका
या फोटोमध्ये रुपालीने व्हाईट रंगाची साडी परिधान केली असून तिने केसात दोन गुलाबाची फुले सुद्धा लावली आहेत. रुपाली या लूकमध्ये गोड दिसत आहे. या फोटोवर रुपालीने “would rather wear honest tears than the most beautiful and elaborately faked smile” असे कॅप्शन दिले आहे. रुपालीच्या या फोटोवर तिच्या एका चाहतीने तिला “तु माधुरी दिक्षित सारखी दिसते” असे म्हंटल आहे. तर तुम्हाला रुपालीने पोस्ट केलेला हा फोटो कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. (Rupali Bhosale New Photo)
मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी रुपालीचा प्रवास प्रचंड कठीण होता. घराघरात रुपालीच्या भूमिकेला प्रेक्षक वाईट म्हणत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे. ही लोकप्रियता मिळवण्यासाठी रुपालीने खूप मेहनतही घेतली आहे.
एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे काम शोधण्यासाठी धडपड असा तिचा प्रवास सुरु होता. रुपाली सांगते की खूप काळ खूप खडतर होता. अर्थातच आयुष्य संपवण्याचाही विचार तिच्या मनात आला, पण तिच्यावर अवलंबून असलेल्या आईवडिलांचे तिच्या नंतर कसे होईल या विचाराने तिने स्वतःला खंबीर बनवले. आज रुपाली आज ज्या ठिकाणी उभी आहे तिथे तिचा हात तिची जुनी परिस्तिथी कधीच पकडू शकत नाही. आई कुठे काय करते या मालिकेच्या आधी रुपाली आपल्याला “बिग बॉस मराठी सीजन २” मध्ये दिसली होती.