मराठी कलाविश्वातील अभिनेत्री अमृता देशमुख अभिनयासह तिच्या क्युट लूकसाठी ओळखली जाते. रेडिओ जॉकी म्हणून अमृताने या क्षेत्रात एन्ट्री केली होती. त्यानंतर ती ‘पुढचं पाऊल’, ‘फ्रेशर्स’, ‘स्वीटी सातारकर’ यांसारख्या अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसली. पण, तिला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून. अनेक वर्ष रुपेरी पडद्यावर काम केल्यानंतर ती आता रंगभूमीकडे वळली असून तिचं ‘नियम व अटी लागू’ हे नाटक सध्या सुरु आहे. (Amruta Deshmukh share a Video)
तब्बल दीड महिने अमेरिकेत नाटकाचे यशस्वी प्रयोग पार पडल्यानंतर नुकतीच ती मुंबईत परतली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या प्रवासात अमृताला अनेक चाहत्यांशी भेटली असून तिथल्या लोकांच्या घरी जाऊन तिथल्या पदार्थांचा आस्वाद तिने घेतला. त्याचबरोबर तिथल्या चाहत्यांसह तिने अनेक गोड क्षण अनुभवले. या भेटीचा एक कोलाज व्हिडिओ तिने शेअर केला. ज्यात तिने त्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे.
हे देखील वाचा – घटस्फोटानंतर तेजश्री प्रधानला पुन्हा करायचं आहे लग्न, स्वतःच केलेला खुलासा, म्हणालेली, “लग्नासाठी मागण्या येत नाहीत कारण…”
हा व्हिडिओ शेअर करताना ती म्हणाली, “आता कुठे माझे नातेवाईक माझ्या लक्षात राहायला लागले होते. त्यात अचानक इतक्या मोठ्या कुटुंबाची माझ्या आयुष्यात एन्ट्री झाली. जे माझे होस्ट होते अमेरिकेत त्यांनी आमटी भात ते मेक्सिकन अश्या विविध पदार्थांचा प्रेमाने पाहुणचार केला. काहींनी खास सुट्ट्या काढून फिरायला नेलं! असे पण काही लोक आहेत जे या फोटोमध्ये नाही, पण त्यांच्या प्रेमामुळे ते माझ्या मनात कायम राहतील. आता ही सगळी मंडळी इन्स्टाग्रामवर नाही, पण तरी ती माझ्या मनात घर करून गेली.”, असं म्हणत तिने त्या सर्वांचे आभार मानले आहेत. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात ‘नागीन’ फेम मराठी अभिनेत्रीची बहीण व तिच्या पतीचा मृत्यू, व्हिडिओ शेअर करत धक्कादायक खुलासा
दरम्यान, अमृता देशमुख तिच्या नाटकांव्यतिरिक्त प्रसाद जवादेबरोबरच्या नात्यांमुळे चर्चेत आली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या दोघांची जोडी इतकी लोकप्रिय झाली की, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. ‘बिग बॉस’ पुरताच दोघांचं प्रेम मर्यादित न राहता त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. नुकताच या जोडीचा साखरपुडा पार पडला असून हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.