सध्या सगळ्यांनाच सगळं सोप आणि सूटसुटीत आवडतं. मग ते घर असो, कपडे असो वा घरात वापरण्याचं सामान. प्रत्येक गोष्ट करताना ती लगेच व्हावी आणि कमी कष्टामध्ये व्हावी असा विचार सगळेच जण करतात. यासाठी इंटरनेटवर अनेक अशा वस्तु उपलब्ध असलेल्या दिसून येतात. मात्र अनेकदा उपयोगी असणाऱ्या या वस्तूंची किंमत अधिक असलेलीदेखील दिसून येते. आता या गोष्टी कुठे आणि स्वस्त दरात कुठे मिळतील याबद्दल आपण आता जाणून घेऊया. स्मार्ट, स्वस्त व एकदम उपयोगी अशा वस्तु कुठे मिळतील याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (budgetfriendly gadgets)
सध्या बाजारात अनेक अत्याधुनिक गॅजेट्स किंवा गृहपयोगी वस्तू पाहायला मिळतात पण ते वापरायचे कसे? तसेच त्याचे नवीन काय ट्रेंड आहे? यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. हा गोंधळ उडू नये म्हणून अशी जागा मिळाली आहे ज्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. मस्जिद बंदर येथील रेनबो इंपेक्स या दुकानामध्ये अशा काही गोष्टी खूप स्वस्त दरात मिळतात. या ठिकणी अत्याधुनिक गृहोपयोगी वस्तू आणि गॅजेट्स अगदी रुपये दहा पासून मिळण्यास सुरुवात होते. या दुकानामध्ये होलसेल मध्ये वस्तू मिळतात. काही वेळेस तुम्हाला या गोष्टी रिटेल म्हणजे किरकोळ स्वरूपात विकत घेता येऊ शकतात.
या ठिकाणी सिलीकॉन ऑइल ब्रश, फ्रीजचे पार्टीशियनच्या वस्तु, पेपरसोप, वेल्डिंग टुल, नळाचे फिल्टर, तळणीचे साधन, मोमो मेकर, बाथ मसाजर,ब्रश होल्डर, डबल साइड टेप, रॅक, आईस फेस मसाजर, पाण्याची मोठी बाटली उचलण्याचे साधन, ऑइल कंटेनर, तसेच गोळ्या ठेवण्यासाठी खास बॉक्स, तसेच फरशी पुसण्यासाठी मॉब, वायपर. त्याचप्रमाणे छोटा मिक्सर, वॅक्युम क्लीनर, डोअर मॅट, लहान मुलांसाठी जाळी, फ्लोअर क्लीनर, तसेच कपडे सुकवण्यासाठी आधुनिक यंत्र तसेच किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तु याठिकाणी तुम्हाला खरेदी करता येऊ शकतात.
या सगळ्या वस्तु फक्त १० रुपयांपासून तुम्हाला मिळू शकतील. या वस्तूंचा वापर तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरु शकतो. या सगळ्या वस्तु रेनबो इम्पेक्स, २५४ पहिला मजला, नागदेवी स्टेशन, क्रॉफर्ड मार्केट, लोहार चाळ, मस्जिद बंदर, मुंबई या पत्त्यावर मिळतील. लवकरात लवकर या दुकानात जाऊन हव्या त्या वस्तु अगदी स्वस्त दरात विकत घ्या.