भुवनेश्वरीचा दरारा, अधिपतीचे आईप्रति आणि अक्षराचे कुटुंबाप्रति असलेले प्रेम तसंच अधिपती व अक्षरा यांच्यामधले दिलखुलास नाते, त्याचबरोबर चारुहास-अधिपती या बापलेकामधील गैरसमज अशा अनेक कारणांमुळे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक मालिका झाली आहे. काही दिवसांपूर्वी चारुलताची एन्ट्री झाली आहे. चारुलताच्या एन्ट्री नंतर मालिकेला एक नवीन वळण आलं आहे. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर अक्षराला चारुलता सापडते. त्यांच्यात सर्व काही आलबेल सुरु असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येतो तो म्हणजे अक्षराला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजते. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते.
गेले काही दिवस अधिपतीने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यासाठी अक्षरा प्रयत्न करताना दिसत होती. पण अधिपती काही केल्या चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. पण आता तो चारुलताला आईसाहेब म्हणून साद देणार आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या नवीन ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – Video : भर मुलाखतीत मुकेश खन्ना भडकले, उपस्थितांना नको नको ते बोलले अन्…; नेटकरी म्हणाले, “जया बच्चनसारखे…”
या नवीन प्रोमोमध्ये अक्षराला अधिपतीला समजावत आहे. “तुम्ही वेळीच जागे व्हा, तुमच्या डोळ्यात धूल फेकली जात आहे. हे सगळं खूप भयंकर आहे” असं अक्षरा अधिपतीला सांगते. त्यानंतर चारुलता येते आणि अधिपतीला असं म्हणते की, “हिला काय झालं आहे? ही अशी का वागत आहे?”. यानंतर अधिपती “काही झालं नाही” असं म्हणत चारुलताला आईसाहेब असं म्हणतो. यानंतर अक्षराच्या चेहऱ्यावरकहा रंगच उडतो. त्यामुळे आता चारुलताच्या जाळ्यात अधिपती अडकणार की काय? हे पहायला मिळणार आहे.
दरम्यान, मलिकेत इतके दिवस अधिपती व चारुलता यांच्यात थोडे तणावपूर्वक नाते होते. अधिपती चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता. पण आता त्याने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारले की काय? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच चारुलताच्या या जाळ्यात अडकलेल्या अधिपतीला अक्षरा कशी बाहेर काढणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.