‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस. मृणालने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. साधी, सोज्वळ, सुशील अशा अभिनेत्रींच्या यादीत मृणालचं नाव आवर्जून घेतलं जातं. छोटा पडदा गाजवलेल्या मृणालने मात्र काही काळ सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र आता अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. लवकरच अभिनेत्री ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी तिने आणखी एक आनंदवार्ता दिली आहे ती म्हणजे तिच्या नवीन रेस्टॉरंटची. (Mrunal Dusanis Husband Job)
अभिनेत्रीने हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं असून ठाण्यात तिने स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. मृणाल आणि नीरज या दोघांनी ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं असून याचं नाव Belly Laughs असं आहे. कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद लोकांना रेस्टॉरंटमध्ये घेता येईल. ठाण्यातील हिरानंदानी भागात मृणालने हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे. यावेळी मृणालने आपल्या नवऱ्याच्या साथीने फूड इंडस्ट्रीमध्ये काही तरी करायचे असल्याचे सांगितले. या रेस्टॉरंटच्या उद्घाटनानिमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर मृणालने आपल्या पतीसह खास संवाद साधला.
यावेळी मृणालने असं म्हटलं की, “आम्हा दोघांनाही लोकांना खाऊ घालण्याची आवड आहे. आम्ही घरच्या घरी काहीना काही बनवायचो आणि लोकांना खायला बोलवायचो. तर तो प्रवास आता रेस्टॉरंटपर्यंत आला आहे. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअरचं शिक्षण घेत असतानाच तो कामही करत होता. कॅफेमध्ये वगैरे तो काम करायचा. त्यामुळे या रेस्टॉरंटला त्याची तेव्हाची एक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आणि माझी आवड असं मिळून आमचं हे रेस्टॉरंट उभं झालं आहे”.
आणखी वाचा – आकर्षक इंटिरिअर, प्रशस्त जागा अन्…; असं आहे मृणाल दुसानिसचं ठाण्यातील नवीन रेस्टॉरंट, पाहा Inside Video
दरम्यान, मृणालने या नवीन व्यवसायासह प्रेक्षकांचे मनोरंजन करायला देखील सुरुवात केली आहे. लवकरच ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मृणालबरोबर अभिनेता विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे हे कलाकार आहेत. येत्या १६ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल