Sargun Mehta Affair Rumours : टीव्हीच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर सरगुन मेहताने पंजाबी इंडस्ट्रीकडे आपलं पाऊल वळवलं. अनेक पंजाबी चित्रपटातून तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि पंजाबी सिनेसृष्टीची ती सुपरस्टार बनली. आता ती पती रवी दुबेबरोबर एक प्रॉडक्शन हाऊसही चालवते. या प्रॉडक्शन हाऊसचे शो खूप पसंत केले जातात. रवी व सरगुनची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मात्र, मधल्या काळात संगीतकार जानीबरोबर सरगुनचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता स्वत: जानीने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली असून त्याचे पूर्णपणे खंडन केले आहे.
शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये जानी म्हणाले, “मी सरगुनला एक व्हॉईस नोट पाठवली होती, ज्यामध्ये मी म्हटलं होतं की, तुझ्या आयुष्यात सरगुनसारखी मुलगी मित्र, मैत्रीण, पत्नी किंवा बहीण म्हणून असली पाहिजे. ती खूप खास व्यक्ती आहे. या व्यक्तीपेक्षा जास्त कष्टाळू माणूस मी कधीच पाहिला नाही. मी त्याच्याशी इतके चांगले वागतो की काही लोकांना असे वाटते की त्याच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी चालू आहे. पण माझ्यात आणि सरगुनमध्ये तसे काहीच नाही”.
आणखी वाचा – “सतत मारायचे, ते हुकूमशहाच होते आणि…”, वडिलांचा द्वेष करतो आयुष्मान खुराणा, म्हणाला, “मानसिक आघात…”
पुढे ते म्हणाले, “आमचे अफेअर नाही. रवीभाईंबरोबर माझे खूप चांगले संबंध आहेत. सरगुनबरोबरही माझे खूप चांगले संबंध आहेत. ती फक्त माझी मैत्रीण आहे आणि कोणत्याही नात्यात सरगुन सारखी व्यक्ती हवी. एवढीच प्रेरणा आहे. आपल्या कामासाठी २४ तास धावणे. अभिनेत्री म्हणून चित्रपट करणे, व्यवसाय करणे, नातेसंबंध जपणे एवढी तिच्यात हिंमत आहे”.
आणखी वाचा – Video : दगडफेक, चप्पलही फेकून मारली अन्…; ‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचला मोठा गोंधळ, पोलिसांनी लाठीमार करताच…
सरगुन व जानीने अनेक म्युझिक व्हिडीओ एकत्र केले आहेत. तितलियां वर्गा, गल्ला तेरियां, तेरी आंखें, तितलियां, Kis Morh Te, LAARE सारखी गाणी त्यांनी एकत्र केली आहेत. रवी व सरगुनबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे लग्न सात डिसेंबर २०१३ रोजी झाले होते. त्यांनी ’12/24 करोल बाग’ शोमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.