दाक्षिणात्य अभिनेता अल्लुअर्जुन आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला पुष्पा हा चित्रपट प्रचंड गाजला. त्या नंतर काही दिवसांपूर्वीच पुष्पा २ची घोषणा करण्यात आली आहे. पण याबाबत आता एक दुःखदायक बातमी समोर आली. चित्रपटाचं शूटिंग संपवून काही कलाकार हैद्राबाद येथे परतत असताना त्यांच्या बस चा अपघात झाला आणि पुष्पा २ चे काही कलाकार या अपघातात जखमी झाल्याचे समजत आहे.(Pushpa 2 Cast Accident)
अभिनेता अल्लुअर्जुन हा त्या बस मध्ये नसल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यावेळी तो त्याच्या कार ने प्रवास करत होता त्यामुळे त्याला कोणतीही हानी झाली नाही. बस च्या अपघातात झालेल्या जखमी कलाकारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत.

गाडीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने आरटीसी बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली होती. कलाकारांना घेऊन जाणार्या बसच्या चालकाचे आरटीसी बसकडे लक्ष गेले नाही त्यामुळे पुष्पा २ च्या बसची आरटीसी बसला धडक लागली. पुष्पा चित्रपटाच्या पाहिल्याभागाने बॉक्स ऑफिस वर चांगलाच धुमाकूळ घातलेला पहायला मिळाला. चित्रपटातील पुष्पा आणि श्रीवल्लीची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडली त्याच बरोबर चित्रपटातील गाणी आजही ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यामुळे दुसऱ्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.