अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील गाजलेल्या चित्रपट, नाटक किंवा मालिकांचं नेहमी कौतुक करत असतात किंवा त्याच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच काही जुन्या आठवणी जागृत केल्या आहेत. ये जवानी हे दिवानी चित्रपटाच्या टीम ने रियूनियन केले आहे. काल या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 वर्षे झाली त्या निम्मित ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे.(Deepika Padukone Ranbir Kapoor)
ये जवानी हे दिवानी हा चित्रपट तरुण पिढीच्या मनावर राज्य गाजवणारा ठरला 10 वर्षांनंतरही चित्रपटाची क्रेझ अद्यापही कमी झालेली दिसत नाही. शाळे पासूनचे काही मित्र अचानक एकत्र भेटतात आणि प्रवासाला निघतात. त्या प्रवासात एक मेकांची झालेली नवीन ओळख झाली त्या नंतर झालेली त्यांची मैत्री आणि पुढे एकमेकांच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयनामध्ये प्रत्येकाचा भाग घेणं हे सगळं या चित्रपटात पाहायला मिळालं.

विशेष म्हणजे चित्रपटाच्या गाण्यांनी देखील चित्रपटाच्या यशात मोठी कामगिरी बजावली. चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय या कलाकार मंडळींसह अन्य कलाकार देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर्यन मुखर्जी यांनी केले असून कारण जोहर ने चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली होती. स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करणाऱ्या अनेक लोकांसाठी तसेच मैत्री कशी असावी हे देखील जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना हा चित्रपट प्रेरणादायी ठरणारा होता.

हे देखील वाचा – ‘मला लग्न झालेली बाई माझ्या चित्रपटात नको आहे’ कोठारेंनी झपाटलेला मध्ये निवेदिता यांना नाकारला रोल
चित्रपटातील नैना आणि बनी ही दोन पात्र चांगलीच लोकप्रिय ठरली होती आणि आजही ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.चित्रपटातील कलाकारांच्या रियुनिअनचे काही फोटोज पिंकविलाने पोस्ट केले आहेत. (Deepika Padukone Ranbir Kapoor)
